आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलची धमकी : कडक सुरक्षा व्‍यवस्‍थेत खेळाडू पोहोचले मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोटमध्ये विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या हार्दिक पटेला पोलिसांनी घेतले. - Divya Marathi
राजकोटमध्ये विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या हार्दिक पटेला पोलिसांनी घेतले.
राजकोट– भारत आणि साउथ आफ्रिका यांच्यात आज तिसरा वन डे राजकोटमध्ये खेळला जात आहे. हार्दिक पटेल आणि पटेल-पाटीदार समाजाने दिलेल्या प्रदर्शनाच्या धमकीमुळे स्टेडियमवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. येथे कोणत्याही अनुचित प्रकार घडूनये म्हणून पोलिस सिक्युरिटी बरोबरच कमांडोजदेखील तैनात करण्यात आले आहेत. पाटीदार प्रदर्शनकारी खेळाडूंची बस आडवतील या शंकेने खेळाडूंसह अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली होती. दोन्ही संघाच्या खेळाडूंना साधारणपणे 12 वाजता स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्तात पोहोचवण्यात आले.
नमाज पठणासाठी जातानाही होती कडेकोट सुरक्षा
राजकोट येथील 4 स्टार हॉटेलमध्ये थांबलेल्या आफ्रिन संघाने येथे गरब्याचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्या साठी येथे गरब्याचे खास आयोजन करण्यात आले होते. येथेदेखील खेळाडुंच्या सुरक्षा व्यवस्थेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. शुक्रवारी देव्हा आफ्रिकन संघाचा खेळाडू इमरान ताहिर याने मशिदीत नमाज पठन करण्याची जाण्याच इच्छा व्यक्त केली तेव्हा, हॉटलमधील कर्मचार्‍याने त्याला जवळच्याच एका मशिदीत नेले. इमरान शिवाय फरहान बेहरदीन, हाशिम अमला, पाकिस्ताचे अंपायर अलीम दार आदींना कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नमाजसाठी नेण्यात आले.
30 वर्षांनंतर होत आहे गुजरातमध्ये अशा प्रकारचे आंदोलन
- पटेल-पाटीदार समाजाच्या रिझर्वेशनच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाने ऑगस्टमध्ये गुजरात पार ढवळून निघाला होता. 30 वर्षांनंतर गुजरातमध्ये अशा प्रकारचे आंदोलन होत आहे. मजेची गोष्ट ही आहे की, तेव्हा जे आंदोलन झाले होते ते आरक्षणाच्याविरोधात झाले होते. मात्र आता जे आंदोलन होत आहे ते आरक्षणाच्या मागणीसाठी होत आहे.
- या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल नावाचा 22 वर्षांचा तरून करत आहे.
ही आहे पटेल समाजाची मागणी
- पाटीदार-पटेल समाज सरकारी नौकरी आणि महाविद्यालयांमध्ये रिझर्वेशनची मागणी करत आहे. ओबीसी प्रवर्गासाठी पटेल समाज मागणी करत आहे.
गुजरात सरकारची रिझर्वेशन देण्याची का नाही इच्छा
गुजरातमध्ये सध्या ओबीसी साठी 27% रिझर्वेशन आहे. पटेल अप्पर कास्ट आहेत. इकोनॉमिकली आणि सोशली बळकट आहे. यामुळेच गुजरात सरकारची त्यांना रिझर्वेशन देण्याची इच्छा नाही.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....