आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी शॉन मार्शच्या जागी हाशिम आमला पंजाब संघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - द. आफ्रिकेचा दिग्गज सलामीवीर हाशिम आमला लवकरच आयपीएल-९ मध्ये खेळताना दिसेल. तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघात जखमी शॉन मार्शच्या जागी खेळेल. पाठीच्या दुखापतीमुळे शॉन मार्श आयपीएलच्या या सत्रातून बाहेर झाला आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आमलासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या असून तो लवकरच पंजाब संघात जुळेल. द. आफ्रिकेचा माजी कर्णधार आमला याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण करेल. फेब्रुवारीत झालेल्या बोली प्रक्रियेत आमलाची बेस प्राइस १ कोटी रुपये इतकी होती. मात्र, त्याला एकाही संघाने खरेदी केले नव्हते. आमलाने द. आफ्रिकेसाठी ८८ टी-२० सामने खेळताना ३१.३५ च्या सरासरीने २४४६ धावा काढल्या आहेत. भारतात नुकत्याच झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याने ४ सामन्यांत १२० धावा काढल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...