आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहीने दबावात सोडले कर्णधारपद! रिझाइन मेलमध्ये लिहिले, मार्गदर्शन करायला तयार आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - एमएस धोनीने अचानक कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसह अनेक तज्ज्ञांनाही पडलेला आहे. 4 जानेवारीला सायंकाळी धोनीने BCCI ला ई मेल पाठवत कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यात धोनीने जो मजकूर लिहिला होता, त्यावरून त्याने मनाने नव्हे तर कोणाच्या तरी सांगण्यावरून कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय घेतला होता, असे अंदाज लावले जात आहेत. 

धोनीने लिहिले, विराटला मार्गदर्शन करायला तयार आहे..  
- धोनीने रिजाइन केलेल्या मेलमदील मजकूर असा होता, मी भारताच्या वन डे कर्णधारपदाचा राजीनामा देतो, आणि विराटला मार्गदर्शन करायला तयार आहे. 
- धोनीच्या मेलमधील शेवटची ओळ याकडे इशारा करते की, त्याने मनाने नव्हे तर कोणाच्या तरी सांगण्यावरून कर्णधारपद सोडले होते. म्हणजेच कोणाच्या तरी मुद्द्याला त्याने होकार दर्शवला आहे. 

2019 चा वर्ल्ड कप टार्गेट? 
- धोनीने आगामी 2019 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपचा विचार करून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनीची चीफ सलेक्टर एमएसके प्रसाद यांच्याशी 4 जानेवारीला चर्चा झाली होती. 
- कर्णधारपद सोडण्याचा ईमेल केल्यानंतर त्यांनी BCCI चे सीईओ राहुल जोहरी यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली होती. त्यावेळी त्याने 2019 चा वर्ल्ड कप होईपर्यंत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 
- धोनीने म्हटले होते की, तो टीममध्ये बदल करण्यास तयार आहे. तसेच विराट कोहली आणि टीमला इंग्लंमध्ये होणार्या स्पर्धेसाठी तयार करण्यात येणार आहेत. 
- यावेळी त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असण्याच्या मुद्द्याची वकिलीही केली. टीम इंडिया आता त्याच्या नव्हे तर कोहलीच्या वलयात असल्याचे त्याने मान्य केले. 
- गेल्या काही दिवसांत कर्णधारपदाबरोबरच धोनीच्या फलंदाजीतही दम पाहायला मिळाला नाही. विराट मा६ दोन्ही पातळ्यांवर त्याच्यापेक्षा सरस ठरला. 
- त्यामुळे धोनीला संघातील स्थान टिकावण्यासाठी फलंदाजीचा सराव करायचा आहे. त्यामुळे तो मेंटरच्या भूमिकेत असेले 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीचा रेकॉर्ड...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...