आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: हे चौघे ठरले आफ्रिका विजयाचे खरे हिरो अन् हा ठरला टर्निंग पॉइन्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टी-20 आणि वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर भारतीय संघाने कसोटी मालिकेत मात्र जोरदार पुणरागमन केले. या मालिकेत भारताने द. आफ्रिकेला 3-0 ने जबरजस्त लोळवले. भारताच्या या विजयाचे खरे हिरो आथवा शिल्पकार ठरले ते फिरकीपटू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा. फलंदाजीचा विचार केला तर अजिंक्य रहाणे सर्वाधिक भरवशाचा फलंदाज ठरला.
कसोटी मालिकेचे निकाल
* पहिला कसोटी सामना : मोहालीमध्ये भारताने आफ्रिकेचा 108 धावांनी पराभव केला.
* दूसरा कसोटी सामना : बेंगळुरु कसोटी पावसामुळे ड्रॉ.
* तिसरा कसोटी सामना : नागपूरमध्ये भारताचा 124 धावांनी विजय
* चौथा कसोटी सामना : दिल्लीमध्ये भारताचा 337 धावांनी विजय. (धावांचा विचार केला तर भारताचा सर्वात मोठा विजय)

भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर
या विजयानंतर भारताला 10 गूण मिळाले आहेत. आता भारताचे 110 गूण झाले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची क्रमवारीत प्रत्येकी एक-एकने पिछेहाट झाली. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. मात्र हाशिम आमलाच्या संघाचा क्रमांक 1 चा ताज कायम आहे. आफ्रिका आणि भारत यांच्यात आता, केवळ चार गुणांचीच तफावत आहे.
विजयाचे चार शिल्पकार
* आर. अश्विन
* रवींद्र जडेजा
* अजिंक्य रहाणे
* खेळपट्टी
आर. अश्विनसमोर आफ्रिकन फलंदाजांनी घेतले लोळन
भारताच्या विजयाचा खरा हिरो अथवा शिल्पकार ठरला तो आर. अश्विन. संपूर्ण मालिकेत आफ्रिकन फलंदाजांनी त्याच्या समोर अक्षरशः लोळण घेतले. आफ्रिकेचा कोणताही फलंदाज त्याच्यासमोर टिकाव धरू शकला नाही. त्याने चार कसोटी सामन्यांनच्या सात डावात तब्बल 31 बळी मिळवले तर एकूण 56 शटके निर्धाव फेकली. त्याने चार डावात पाच अथवा पाच पेक्षा अधिक बळी घेतले. तो मालिकेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. अश्विनने द. आफ्रिकेविरुद्ध 31 बळी घेऊन 55 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. 1960 मध्ये इंग्लंडच्या स्टेथमने 27 बळी घेतले होते.
अश्विनच्या फलंदाजीतही दिसला दम
अश्विनने गोलंदाजीतर कमाल कोलीच, मात्र तो फलंदाजीतही चमकला. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताची दानादान उडण्याची शक्यता असतानाच त्याने अर्ध शतकही (56) ठोकले. त्याने या मालिकेत एकूण 101 धावा केल्या. रहाणेचे शतक आणि अश्विनच्या अर्धशतकाच्या बळावार भारताला पहिल्या डावात 334 धावा करता आल्या. अश्विनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मालिका विराच्या किताबाने गैरविण्यात आले.
-पुढाल स्लाइड्सवर जाणून घ्या, विजयाचे इतर हिरो...
-कुणी केली काय कमाल...
-नेमका काय ठरला दिल्ली कसोटीचा टर्निंग प्वाइंट?