ढाका- दक्षिण आफ्रीकेचा जलद गोलंदाज कॅगिसो रबादाने, शनिवारी बांग्लादेश विरूध एकदिवशीय आंतरराट्रीय सामन्यात पदार्पण केले आहे. त्यांनी पदार्पणाच्या पहिल्याच सामण्यात हॅट्रिक करूण एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. अशा प्रकारचा रेकॉर्ड बनवणारा तो जगातिल दुसरा गोलंदाज ठरला आहे.
रबादाने आपल्या दुस-याच ओव्हरच्या अंतिम तीन बॉलवर तमीम इकबाल, लिटन दास, आणि महमुदुल्लाहला आऊट करूण हॅट्रिक पुर्ण केली. या आधी अशाप्रकारचा रेकॉर्ड बांग्लादेशाचे ताईजुल इस्लामने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झिबॉम्बे विरूद्ध पदार्पणातच याच मैदानावर रेकॉर्ड बनवला होता.
रबादाने आठ ओव्हरमध्ये 16 रन देऊन 6 विकेट घेतले. पदार्पणात सर्वश्रेष्ठ कामगिरी पार पाडत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. या आधी पदार्पणात सर्वश्रेष्ठ कामगिरी वेस्टइंडिजच्या फिडेल एडवर्डस् च्या नावावर आहे. त्यांनी हा रेकॉर्ड झिबॉम्बे विरूध हरारे येथे 2003 मध्ये 22 रन देऊन 6 विकेट घेतले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजामध्ये रबाचा आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. त्यांनी मखाया एनटिनीचा 2006 मधील ऑस्ट्रेलिया विरूद्धचा 22 रनमध्ये 6 विकेटचा रेकॉर्ड मोडला आहे.