आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंडियन क्रिकेटच्या इतिहासातील काही AMAZING MOMENTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल 2011 चा भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तो क्षण. हा क्षण खास होता याचे कारण म्हणजे WC जिंकणे हे सचिनचे स्वप्न होते. त्यासाठी संपूर्ण टीमने प्रयत्न केले होते. - Divya Marathi
एप्रिल 2011 चा भारताने दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला तो क्षण. हा क्षण खास होता याचे कारण म्हणजे WC जिंकणे हे सचिनचे स्वप्न होते. त्यासाठी संपूर्ण टीमने प्रयत्न केले होते.
भारतीय क्रिकेट संघ नुकताच वेस्ट इंडिज दौरा करून मायदेशात परतला आहे. भारताने कॅरेबियन भूमीवर प्रथमच 2-0 अशी कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी भारताने एकदाही वेस्ट इंडिजच्या भूमीत एका मालिकेदरम्यान एकापेक्षा जास्त कसोटी जिंकली नव्हती. मात्र हा पराक्रम करून विराट कोहलीची टीम भारतात परतली आहे. भारत हा क्रिकेट खेळामधील बलाढ्य देश म्हणून नावारूपाला आला आहे. विराट कोहलीसह अश्विन, साहा या खेळाडूंनी चांगले योगदान दिले.
असे असले तरी क्रिकेटच्या दुनियेत भारताला सर्वोच्च स्थानी पोहोचवण्यात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंचे योगदान दिले आहे. मात्र यात आघाडीवर आहे सचिन तेंडूलकर. सचिनने अत्यंत कमी वयात क्रिकेटमध्ये पदार्पण करून अक्रामक खेळीने संपूर्ण जगाला वेड लावले. सचिन जेव्हा बॅटींगसाठी मैदानात असायचा तेव्हा दुसऱ्या बाजूने खेळत असलेल्या संघाचे खेळाडू आधीच दबावात असायचे. सचिनने 200 व्या कसोटीनंतर भारतीय क्रिकेटमधून सन्यास घेतला तेव्हा संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकला होता. भारतीय क्रिकेटमधील असेच काही अविस्मरणीय क्षण divyamarathi.com ने तुमच्यासाठी आणले आहेत. हे HISTORICAL फोटो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर शहारा आला नाही तर नवलच...
पुढील स्लाइड्सवर पाहा, क्रिकेटच्या इतिहासातील असेच काही PHOTOS....
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...