आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून कर्णधार सरदार सिंग, हरमनप्रीत सिंगने केले गोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपोह (मलेशिया) - आशियाई चॅम्पियन भारतीय संघाने अझलनशाह हाॅकी स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. भारतीय हॉकी संघाने बुधवारी स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात जपानला २-१ ने नमवले. या शानदार कामगिरीसह भारताने स्पर्धेत विजयी सुरुवात केली. सुलतान अझलनशाह हॉकी स्पर्धेच्या आयोजनाचे हे २५ वे वर्ष आहे. भारताला गुरुवारी वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाशी लढायचे आहे.

जपानविरुद्ध १-० ने मागे पडल्यानंतर भारताने या सामन्यात चांगला खेळ केला. गोल करण्याच्या चांगल्या मूव्ह तयार केल्या. काही प्रयत्न अपयशी ठरले तरीही भारताने शानदार दोन गोलच्या बळावर िवजयश्री मिळवली. जपानच्या केंजी किताझातोने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १-० ने मागे पडल्यानंतर भारतीय संघ दबावात आला. भारताचा युवा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला गोल करून भारतासाठी गोलचे खाते उघडले. त्याच्या या गोलने भारताला सामन्यात १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर ३२ व्या मिनिटाला कर्णधार सरदारा सिंगने गोल करून भारताची आघाडी २-१ अशी केली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, दोन्ही संघांना यात यश मिळू शकले नाही. भारताच्या तुलनेत अपेक्षेनुसार दुबळ्या जपानने चांगला खेळ केला. भारताला लय मिळवण्यास वेळ लागला.
पाकचा सोपा विजय
इतर एका सामन्यात पाकिस्तानने मो. अर्सलान कादीरच्या दोन गोलच्या बळावर कॅनडाला ३-१ ने हरवले. कादीरने २७ व्या, २८ व्या मिनिटाला गोल केले.