आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • How Ajinkya Rahane Porposed His College Life Girlfirend Radhika And Than What Happened Next

लहानपणीची मैत्रीण ते कॉलेज Life गर्लफ्रेंड, अशी आहे अजिंक्य रहाणेची लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंक्य रहाणे आणि राधिका लग्नाआधी (डावीकडे) आणि लग्नानंतर (उजवीकडे) - Divya Marathi
अजिंक्य रहाणे आणि राधिका लग्नाआधी (डावीकडे) आणि लग्नानंतर (उजवीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा मिस्टर डिपेंडेबल म्हटले जाणा-या अजिंक्य रहाणेने मंगळवारी आपली पत्नी राधिकाला सोशल मीडियाद्वारे बर्थडे विश केले. रहाणे सध्या आयपीएलमध्ये पुणे सुपरजाएंटकडून खेळत आहे. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला अजिंक्य रहाणेची लव्ह स्टोरीबाबत सांगणार आहोत की, लहानपणीच्या मैत्रीण ते पुढे गर्लफ्रेंड आणि लग्नाचा टप्पा कसा गाठला. शेजारी राहायची राधिका...
 
- अजिंक्य आणि राधिका धोपावकर शेजारी राहायचे आणि दोघांत घट्ट मैत्री होती. दोन्ही परिवार वर्षानवर्षे एकमेंकाना ओळखत होते. काळाच्या ओघात दोघे एकमेंकाना पसंत करू लागले.
- दोन्ही फॅमिली अजिंक्य आणि राधिकात घट्ट मैत्री असल्याचे जाणतच होते. मात्र, पुढे त्यांच्यात नाते होऊ शकते याबाबत अनभिज्ञ होते.
- मात्र, अजिंक्य व राधिकाने आपले नाते पुढे नेण्याचे ठरवले. दोघांनी घरी कल्पना दिल्यावर लग्नाबाबत चर्चा केली.
- दोन्ही परिवाराच्या सहमतीने सप्टेंबर 2014 मध्ये अजिंक्य रहाणे आणि राधिकाने लव-अरेंज्ड मॅरेज केले. लग्नाच्या वेळी रहाणेने आपल्या सोशल नेटवकिंग अकाउंटवर राधिकाला आपली बेस्ट फ्रेंड अॅंड वाईफ म्हटले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिकाचे सोशल मीडियातील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...