IPL-2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या श्रीसंतबाबत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आपले मत मांडले आहे. सौरभ म्हणतो, 'सर्व आरोपांमधून दोषमुक्त असलेल्या श्रीसंतच्या पुनरागमनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कोणतीही अडचण नाही.' न्यायालयाने शनिवारी पुराव्याअभावी श्रीसंत, अंकित चव्हाण अजित चंदिलासह ३६ आरोपींना दोषमुक्त केले. पोलिसांचे ६००० पानांचे आरोपपत्र कुचकामी ठरले. गांगुलीने या निर्णयाचेही स्वागत केले आहे. बंगाल क्रिकेट संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारोहात त्याने या विषयी मत मांडले.
'श्रीसंत सर्व आरोपातून तो सुटला असल्याने त्याच्या पुनरागमनाची BCCI ला कोणती अडचण असेल असे वाटत नाही. पण अखेरचा निर्णय मंडळालाच घ्यावा लागणार आहे.' असेही गांगुली म्हणतो. मात्र, बीसीसीआयने श्रीसंत व चव्हाण यांच्यावर कायमची क्रिकेटबंदी घातली आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असून पुढील भूमिका मंडळाला घ्यायची आहे असे तो म्हणाला.