आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटिंग पाॅवर प्ले बंद, सर्व नोबॉलवर फ्री हिट; गोलंदाजांनाही दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्बाडोस - पुन्हा एकदा वनडे क्रिकेट बदलत आहे. गोलंदाजांची निराशा दूर करण्यासाठी आयसीसीने नुकतीच अनेक नव्या व महत्त्वाच्या बदलांना मंजुरी दिली आहे.

५ जुलैनंतर सामन्यांत बॅटिंग पाॅवर प्ले होणार नाही. सोबतच प्रत्येक नोबॉलवर फ्री हिट मिळेल. सुरुवातीच्या १० षटकांत कॅचिंग फील्डर लावण्याची सक्तीही उठवली आहे. गोलंदाजांसाठी शेवटच्या षटकांत हे बदल फायदेशीर ठरतील. आता फलंदाजांसाठी वनडेत द्विशतक ठोकणे पहिल्यासारखे सोपे राहणार नाही.

बॅटिंग पॉवर प्ले ५ अोव्हर्स, तो ४० ओव्हर्स आधी बॅटिंग करणार्‍या संघाला घ्यावा लागतो. त्यात ३ फील्डर्स ३० यार्ड सर्कलच्या बाहेर राहू शकतात.

परिणाम : सर्वाधिक फायदा गोलंदाजांचा. ३ फील्डर्सची सक्ती संपुष्टात. फलंदाज मोकळेपणाने फटका मारू शकणार नाहीत. जास्त बाउंड्रीजवर मर्यादा येईल.

फ्री हिट सध्या "ओव्हरस्टेपिंग' नो बॉलवर फ्री हिट. इतर नो बॉलवर फक्त अतिरिक्त एक चेंडूच मिळायचा.
आता : फायदा फलंदाजांचा मिळेल. कंबर, डोक्यावरून जाणार्‍या नो बॉलवरही फ्री हिट मिळेल. मोठे फटके मारण्याची संधी मिळेल.

५ फील्डर्सची सूट
सध्या १० ते ४० षटकांपर्यंत ४ फील्डर्स सर्कलबाहेर राहतात. ४० ते ५० षटकांदरम्यान ५ फील्डर्स.
फायदा : बॉलिंग टीम फायद्यात राहील. ३० यार्डच्या सर्कलबाहेर फील्डर्सची संख्या वाढवल्याने चौकार-षटकार कमी लागतील. सोबतच झेलबाद होण्याची शक्यता अधिक असेल.

यामुळे भासली गरज
मोठ्या धावसंख्यांच्या गेल्या काही सामन्यांत पाॅवर प्लेची मोठी भूमिका होती. गोलंदाज झोडपले गेले, त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बिघडला. सुरुवातीच्या १० षटकांत कॅचिंग फील्डर्सच्या सक्तीमुळे कर्णधाराचे पर्याय मर्यादित असत. ४१ ते ५० षटकांदरम्यान ३० यार्ड सर्कल बाहेर ४ फील्डर असल्याने फलंदाज फटकेबाजी करत. गोलंदाजांना सुरुवातीची १० षटके आव्हानात्मक असत.
बातम्या आणखी आहेत...