आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Clears Sunil Narine's Remodelled Bowling Action, But He His Lost His Father

वेस्ट इंडिजच्या सुनील नरेनला मोठ्या दु:खानंतर सुखद धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील नरेन - Divya Marathi
सुनील नरेन
मुंबई- मागील वर्षभरापासून संदिग्ध गोलंदाजी अॅक्शनमुळे मैदानाबाहेर असलेला विंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेनला आयसीसीने दिलासा दिला आहे. त्याच्या गोलंदाजी अॅक्शनला आयसीसीने मान्यता दिली. याशिवाय, आता त्याला आयसीसीने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्यासही हिरवा कंदील दाखवला आहे.
आजपासून सुरु होणा-या भारतातील आयपीएल स्पर्धेतही त्याला खेळण्याची परवानगी दिली आहे. एकीकडे, नरेन याला मोठा दिलासा मिळाला असला तरी सध्या तो एका मोठ्या दुखा:त आहे. सुनील नरेन याचे वडिल शाहीन नरेन यांचे 1 एप्रिल रोजी त्रिनिदाद येथील राहत्या घरी निधन झाले. त्यामुळे तो भारतात येऊ शकला नाही. वडिलांच्या निधनामुळे तो आयपीएलमधील पहिल्या आठवड्यात खेळू शकणार नसल्याचे केकेआरचे प्रशिक्षक जॅक्स कॅलिस यांनी कळविले आहे.
आयसीसीच्या या निर्णयाने सुनील नरेनसोबत कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सुनील नरेनच्या गोलंदाजीची 28 मार्च रोजी दुबईत पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली होती. अखेर आयसीसीच्या तांत्रिक समितीने त्याची गोलंदाजी वैध असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याला सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे.
पुढे वाचा, क्रिकेटचे जबरदस्त चाहते असलेल्या सुनील नरेनचे त्याच्या वडिलांनी 'सुनील' असे का ठेवले नाव....