आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायचीतचा नवा नियम; गोलंदाजांना होणार लाभ, आयसीसीने दिली बदलाला मान्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिनबर्ग - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पायचीतच्या निर्णयामध्ये बदल करण्यास सहमती दर्शवली. या नवीन नियमामुळे गोलंदाजांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. बैठकीत आयसीसी, आयडीआय आणि आयबीसी बोर्डाने माजी बीसीसीआय अध्यक्ष आणि सध्याचे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली अनेक बाबींवर चर्चा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पायचितचा निर्णय नेहमीच वादाचा विषय असतो आणि डीआरएसवरही फलंदाज नाराज होतात. आयसीसीने पायचीतसंबंधी पंचांच्या डीआरएस संबंधित नियमांच्या बदलास मंजुरी दिल्याने गोलंदाजांना फायदा होईल.

आयसीसी नाही करणार बदल
कसोटी क्रिकेटला दोन भागांत बदलले जाणार नाही. नवीन वनडे लीगची सुरुवात होणार नाही.

नो बॉलसंबंधी निर्णय नाही
मैदानी पंचाऐवजी तिसरे पंच नो बॉल असल्याचे निर्णय देण्यासंबंधी पुढील काही महिन्यांत चाचपणी केली जाईल. यानंतरच नियमात बदल होईल.

गोलंदाजांना फायदा
आयसीसीने म्हटले की, पायचीतसंबंधी हे नवीन संशोधन ऑक्टोबर किंवा याच्यापूर्वी होणाऱ्या मालिकेत प्रभावीपणे डीआरएसचा वापर होईल. या बदलाने गोलंदाजांना अधिक फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. मैदानी पंचाने निर्णय तिसऱ्या पंचाकडे पाठवल्यास अधिक फलंदाजांना बाद दिले जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...