आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनच्या गोलंदाजीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह, ICC करणार चौकशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली येथे झालेल्या सामन्या दरम्यान शिखर आणि विराट. - Divya Marathi
दिल्ली येथे झालेल्या सामन्या दरम्यान शिखर आणि विराट.
दुबई- भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनची गोलंदाजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशन (आयसीसी) याप्रकरणी चौकशी करणार आहे. आयसीसीनुसार, शिखर धवनचा हात गोलंदाजी करताना 15 अंशांपेक्षा अधिक वळतो. हे नियमांच्या विरोधात आहे. शिखर ऑफ स्पिनर गोलंदाज आहे.
शिखरने फेकली होती तीन षटके
-शिखर धवनने द. आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी केली होती.
- त्याने तीन षटकांपैकी एक षटक निर्धाव फेकले. तर उर्वरित दोन षटकात नऊ धावा दिल्या होत्या.
-सामना अधिकारीने शिखरच्या गोलंदाजीच्या पद्धतीवर शंका घेत ICCकडे तक्रार केली होती.
14 दिवसांत द्यावी लागेल चाचणी
- शिखरला आता 14 दिवसांत गोलंदाजीची (बॉलिंग अॅक्शन) चाचणी द्यावी लागेल.
- शिखर या चाचणीत यशस्वी ठरला तरच त्याला भविष्यात गोलंदाजी करता येणार आहे.
काय आहे 15 अंशांचा नियम
- क्रिकेटमधील सध्याच्या नियमांनुसार, कोणताही गोलंदाज गोलंदाजी करताना आपला हात खांद्याच्यावर गेल्यानंतर केवळ 15 अंशातच वळवू शकतो.
- साधारणपणे प्रत्येक गेंदबाज गोलंदाजी करताना आपला हात कोपऱ्यापासून थोड्याफार प्रमाणातच वळवतो. बायो मेकेनिक्सच्या एक्स्पर्ट पॅनलने सांगितल्यानंतर आयसीसीने हा नियम बनवला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोटला कसोटी सामन्यादरम्यानचे शिखर धवनचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...