आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विन दुसऱ्या, तर जडेजा सातव्या स्थानी; क्रमवारीत दोघांची प्रगती!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा ऑफस्पिनर आर. अश्विन कसोटीत वेगाने २०० बळी घेणारा देशाचा गोलंदाज ठरला. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीतही अश्विनने प्रगती केली आहे. क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अश्विनने दुसरे स्थान पटकावले आहे. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर येथील कसोटीत अश्विनने १० गडी बाद केले होते. या सामन्यात त्याने २०० बळींचा टप्पा गाठला होता.

न्यूझीलंडविरुद्ध कमालीचे प्रदर्शन करताना अश्विनने क्रमवारीत इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला मागे टाकले. अश्विन अव्वलस्थानी असलेल्या द. आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या तुलनेत ७ गुणांनी मागे आहे. स्टेन सर्वाधिक ८७८ गुणांसह नंबर वन गोलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत शानदार प्रदर्शनामुळे अश्विन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
कसोटी फलंदाज : टॉप-१०
१. स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया ९०६
२. केन विल्यम्सन, न्यूझीलंड ८७९
३. जो. रुट, इंग्लंड ८७८
४. हाशिम आमला, द. आफ्रिका ८४७
५. युनूस खान, पाकिस्तान ८४५
६. ए.बी.डिव्हिलर्स, द. आफ्रिका ८०२
७. अॅडम वोग्स, ऑस्ट्रेलिया ८०२
८. डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया ७७२
९. अॅलेस्टर कुक, इंग्लंड ७७०
१०. मिसबाह-उल-हक ७६४
कसोटी गोलंदाजी : टॉप-१०
१. डेल स्टेन, द. आफ्रिका ८७८
२. आर. अश्विन, भारत ८७१
३. जेम्स अँडरसन, इंग्लंड ८७०
४. स्टुअर्ट ब्रॉड, इंग्लंड ८३६
५. रंगना हेराथ, श्रीलंका ८३१
६. यासिर शाह, पाकिस्तान ८०६
७. रवींद्र जडेजा, भारत ७९८
८. मिशेल स्टार्क, ऑस्ट्रेलिया ७९२
९. मिशेल वॅग्नर, न्यूझीलंड ७४६
१०. ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंड ७२३
दुसरी कसोटी जिंकली तर टीम इंडिया टॉपवर
न्यूझीलंडविरुद्ध दुसरी कोलकाता येथे होणारी कसोटी भारताने जिंकली तर टीम इंडिया कसोटी क्रमवारीत नंबर वन होईल. पहिल्या कसोटीत भारताने १९७ धावांनी विजय मिळवला होता. सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ नंबर वन पाक संघाच्या तुलनेत एका गुणाने मागे आहे. भारताला नंबर वन होण्यासाठी ही मालिका जिंकणे गरजेचे आहे. टीम इंडियाला इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही विजयासह नंबर वन होण्याची संधी असेल.

कसाेटीत गंभीरचे, तर वनडेत युवराजचे पुनरागमन शक्य
टीम इंडियाचा युवा सलामीवीर के.एल. राहुलचे स्नायू दुखावले असून तो जखमी असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या जागी भारताचा अनुभवी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरची भारतीय संघात निवड होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे तीन वर्षांनंतर युवराजसिंगचेही वनडे संघात पुनरागमन होऊ शकते. बुधवारी युवराजसिंगची फिटनेस चाचणी होणार आहे. गंभीरची मंगळवारी फिटनेस चाचणी झाली.
गंभीर सध्या भन्नाट फॉर्मात असून नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीत त्याने इंडिया ब्ल्यू संघाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकावले होते.

युवराजचे वनडे संघात पुनरागमन? भारताकडून २०१३ मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळणारा डावखुरा फलंदाज युवराजसिंगची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. बुधवारी बंगळुरू येथे फिटनेस चाचणी होणार आहे. यात युवी पास झाला, तर त्याची वनडे संघात निवड होईल, असे संकेत आहेत. युवराज आणि गौतम गंभीर दोघे संघात असावेत, असे कुंबळेला वाटते.
बातम्या आणखी आहेत...