आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ICC Under 19 World Cup 2016: India U19 Beat New Zealand U19 By 120 Runs

U-19 WC : न्यूझीलंडचा 120 धावांनी पराभव करून भारत उपांत्‍यपूर्व फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपुर- टीम इंडियाने शनिवारी अंडर-19 वर्ल्ड कपच्‍या दुस-या लढतीत न्यूझीलंडला 120 धावांनी पराभूत केले. या विजयानंतर संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ग्रुप-डीच्‍या या लढतीत भारताने 8 गड्यांच्‍या मोबदल्‍यात 258 धावा केल्‍या. न्यूझीलंडने 31.3 ओव्‍हरमध्‍ये 138 धावा बनवल्‍या. सरफराज खान (74) आणि ऋषभ पंत (57) यांच्‍यानंतर आवेश खान (32/4), महिपाल लोमरूर (47/5) यांनी घातक गोलंदाजी केली. आवेश मॅन ऑफ द मॅच ठरला.
अशी राहिली न्यूझीलंडची खेळी....
- भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीलाच न्यूझीलंडला हैराण करून सोडले होते.
- न्यूझीलंडचे 4 गडी 16 धावांमध्‍येत तंबूत परतले.
- हे चारही गडी आवेशने बाद केले.
-त्‍यानंतर फिन एलेन (29) आणि क्रिस्टन लियोपार्ड (40) यांनी 49 धावांची भागिदारी केली.
- लोमरारने एका पाठोपाठ एक विकेट घेऊन संघाच्‍या विजयावर नाव कोरले.
- भारताकडून जीशन अंसारीने एक गडी बाद केला.
अशी राहिली भारताची खेळी..
- भारताची सुरूवात खराब झाली. कर्णधार इशान किशन (4) लवकर आऊट झाला.
- त्‍यानंतर आलेला रिकी भुइ हा देखिल लगेच तंबूत परतला.
-19 धावांमध्‍ये दोन गडी बाद झाल्‍यानंतर सरफराज आणि पंतने डाव सावरला.
- सरफराजने 80 चेंडूत 9 चौकार ठोकले, पंतने 83 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
- शिवाय अरमान जाफरने 46 धावांची भागिदारी केली. त्‍याने 49 चेंडूत 2 चौकार लगावले.
- महिपाल लोमरूरने 42 बॉलमध्‍ये 3 चौकार आणि 1 षटकाराच्‍या मदतीने 45 धावांची पारी खेळली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सामन्‍यातील फोटो....