आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • ICC Womens World Cup, 27th Match: India Women V New Zealand Women At Derby

महिला विश्वचषक : भारतीय महिला संंघ 17 वर्षांनंतर उपांत्य फेरीत; न्यूझीलंड पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतक झळकावल्यानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना मिताली राज. - Divya Marathi
शतक झळकावल्यानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना मिताली राज.
डर्बी - विश्वविक्रमीवर मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी अायसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारतीय महिलांनी करा वा मरा असलेल्या सामन्यात न्यूझीलंडवर १८६ धावांनी शानदार विजय संपादन केला. भारतीय महिलांचा ३९ वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्धचा हा सर्वात माेठा  विजय ठरला. यापूर्वी १९७८ मध्ये भारत अाणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला हाेता. यासह भारतीय संघाने (२०००) १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम चारमध्ये प्रवेश केला. अाता गुरुवारी भारताचा उपांत्य सामना अाॅस्ट्रेलियाशी हाेणार अाहे.   
 
सामनावीर राजेश्वरी गायकवाडच्या (५/१५) धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय महिलांनी अवघ्या २५.३ षटकांत सामना जिंकला.  
 
फाॅर्मात असलेल्या कर्णधार मिताली राज (१०९), वेदा कृष्णमूर्ती (७०) अाणि हरमनप्रीत काैरच्या (६०) झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने विजयासाठी न्यूझीलंडसमाेर २६६ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा (२/२६) यांनी न्यूझीलंडला अवघ्या ७९ धावांत राेखले. यादरम्यान माजी कर्णधार झुलन गाेस्वामी, शिखा पांडे अाणि पूनम यादवने प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे न्यूझीलंडला स्वस्तात गाशा गुंडाळावा लागला. न्यूझीलंडकडून सॅटरव्हाइटने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. इतर अाठ महिला फलंदाज धावांचा दुहेरी अाकडाही पार करू शकल्या नाहीत.     
 
नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर पूनम राऊत (४) स्वस्तात बाद झाली. त्यापाठाेपाठ महाराष्ट्राची स्मृती मानधना १३ धावा काढून तंबूत परतली. दरम्यान, कर्णधार मितालीने संघाचा डाव सावरला. 
 
मिताली-हरमनप्रीतची शतकी भागीदारी
मितालीने डाव सावरताना हरमनप्रीत काैरसाेबत शतकी भागीदारी केली. या दाेघींनी तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, हरमनप्रीतने ६० धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. तिने ९० चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे ही अर्धशतकी खेळी केली. तिला कास्पेरेकने बाद केले. 
 
मितालीच्या एक हजार धावा
विश्वविक्रमवीर मितालीने अाता वनडे वर्ल्डकपमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी तिला अवघ्या २३ धावांची गरज हाेती. तिने शनिवारी १०९ धावांची खेळी करून एक हजार धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. अशी कामगिरी करणारी मिताली भारताची पहिली अाणि जगातील पाचवी महिला फलंदाज ठरली. यापूर्वी, न्यूझीलंड डेबी हेकल (१५०१), इंग्लंडची जेनेट ब्रिटिन (१२९९), चार्लाेट एडवर्ड (१२३१) अाणि अाॅस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने ही कामगिरी केली.
 
वेदा-मितालीची भागीदारी
वेदा कृष्णमूर्तीने मितालीसाेबत पाचव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचून टीमच्या धावसंख्येला गती दिली. वेदाने ४५ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ७० धावा काढल्या.
 
राजेश्वरीचा पंच 
भारताची युवा गाेलंदाज राजेश्वरी गायकवाडने शानदार खेळी करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. तिने ७.३ षटकांत १५ धावा देताना पाच विकेट घेतल्या. याशिवाय यात एका निर्धाव षटकाचा समावेश अाहे. तिने सॅटरव्हाइट (२६), डेव्हिने (७), राेवे (४), तहुहू (५) अाणि कास्पेरेकला (०) स्वस्तात बाद केले. तसेच दीप्तीने दाेन बळी घेतले. 
 
पुढील स्लाइडवर धावफलक...
बातम्या आणखी आहेत...