आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाकडे तिसरे स्थान गाठण्याची संधी, वनडे क्रमवारी : द. आफ्रिकेची दुसऱ्या स्थानी धडक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - येत्या १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ एकदिवसीय सामने खेळवले जातील. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे मालिका खेळणाऱ्या टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने किंवा ५-० ने जिंकली, तर भारतीय संघ आयसीसीच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर आयसीसीने नुकतीच वनडे क्रमवारी जाहीर केली. आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ५-० ने धुव्वा उडवताना क्रमवारीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मालिका सुरू होण्याच्या आधी आफ्रिकेचा संघ ११० गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, आता वनडे मालिका जिंकल्यानंतर आफ्रिकेने भारत, न्यूझीलंडला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचे पराभवामुळे ६ गुणांचे नुकसान झाले. मात्र, ऑस्ट्रेलिया ११८ गुणांसह टॉपवर आहे.
भारत-न्यूझीलंड मालिका
रविवारपासून सुरू होणारी वनडे मालिका न्यूझीलंडने ५-० ने जिंकली, तर मग किवीजचे ऑस्ट्रेलिया इतके ११८ गुण होतील. मात्र, न्यूझीलंडने ही मालिका ४-१ ने किंवा ३-२ ने जिंकली तर त्यांचा फायदा होणार नाही. अशा वेळी न्यूझीलंड तिसऱ्या स्थानीच असेल. भारताने ही मालिका ५-० ने गमावली, तर टीम इंडिया इंग्लंडनंतर पाचव्या क्रमांकावर घसरेल. सध्या भारताच्या नावे ११० गुण असून, न्यूझीलंडचे ११३ गुण आहेत. न्यूझीलंड तिसऱ्या, तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने पाच सामन्यांची ही मालिका ४-१ किंवा ५-० ने जिंकली, तर क्रमवारीत टीम इंडिया न्यूझीलंडच्या पुढे जाऊन तिसऱ्या स्थानी येईल. मात्र, भारताने ३-२ ने ही मालिका जिंकली, तर दोन्ही संघांच्या क्रमवारीत बदल होणार नाही. न्यूझीलंडने ही मालिका ५-० ने गमावली, तर किवीज टीम इंग्लंडनंतर पाचव्या स्थानी पोहोचेल. गेल्या काही दिवसांत ११ वनडे सामने झाले. द. आफ्रिका व ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरुद्ध प्रत्येकी १ वनडे खेळला होता. यात आयर्लंडचा पराभव झाला. या दाेन पराभवांमुळे ४२ गुणांसह आयर्लंड टीम १२ व्या क्रमांकावर आहे.
बातम्या आणखी आहेत...