आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

T-20 वर्ल्ड कप 2016: 8 शहरांमध्‍ये होणार सामने, ईडन गार्डनमध्‍ये फायनल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 2016 च्‍या आयसीसी वर्ल्ड कप टी 20 स्‍पर्धेसाठी मैदानांची घोषणाही करण्‍यात आली आहे. देशातील आठ शहरांमध्‍ये या स्‍पर्धेतील सामने होणार असून कोलकाता येथील ईडन गार्डनमध्‍ये अंतिम सामना होईल. 11 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत ही स्‍पर्धा चालणार आहे
कोणत्‍या शहरात कोणते मैदान
* बंगळुरू : एम चिन्नास्वामी स्टेडियम
* चेन्नई: एमए चिदंबरम स्टेडियम
* नवी दिल्ली : फिरोज शाह कोटला
* धर्मशाला : एचपीसीए स्टेडियम
* मुंबई : वानखेडे स्टेडियम
* कोलकाता : ईडन गार्डन
* नागपूर : व्‍हिसीए स्टेडियम
* मोहाली : पीसीए स्टेडियम