आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Pakistan Continues To Play In UAE Its Cricket Will Slowly Slowly Suffer

पाकिस्तानात जाईल टीम इंडिया? राजीव शुक्ला म्‍हणाले - सुरक्षा दिल्‍यास खेळू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरीष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी म्‍हटले आहे की, टीम इंडिया पाकिस्तानात जाऊन क्रिकेट सामना खेळू शकणार आहे. त्‍यासाठी मात्र लाहोरमध्‍ये सुरक्षित वातावरणाची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. पाकिस्तानला डिसेंबर महिन्‍यात भारतासोबत क्रिकेट मालिका खेळायची आहे. या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप निश्‍चित नाही.
शुक्ला आणखी काय म्‍हणाले ?
> शुक्ला यांनी पाकिस्तानच्‍या जियो वृत्‍तवाहिनीला माहिती दिली की, “ जर पाकिस्‍तार क्रिकेट बोर्ड लाहोरमध्‍येच खेळाडूंसाठी सुरक्षित वातावरण तयार करणार असेल, स्टेडियमजवळच हॉटेल बनवत असेल तर, टीम इंडिया तेथे आंतरराष्‍ट्रीय सामने खेळू शकेल. पीसीबीला या बाबीची पूर्ण खात्री द्यावी लागेल.”
> शुक्‍ला म्‍हणाले, ''पाकिस्तानला जर त्‍यांच्‍या देशात आंतरराष्‍ट्रीय सामन्यांचे आयोजन करायचे असेल, तर त्‍यांनी सुरक्षित वातावरणाची हमी द्यायला हवी.''
> “लाहोरमध्‍ये सहजासहजी सुरक्षित वातावरण खेळाडूंसाठी तयार केले जाऊ शकते.'' असेही शुक्‍ला म्‍हणाले.
का कोणता देश पाकसोबत खेळू इच्‍छित नाही
2009 मध्‍ये लाहोरच्‍या गद्दाफी स्टेडियमबाहेर श्रीलंकेच्‍या क्रिकेट टीमवर दहशतवाद्यांनी हल्‍ला केला होता. या घटनेचा संपूर्ण जगभरातून निषेध नोंदवण्‍यात आला होता. त्‍यामुळे जगातील मोठ्या टीम सुरक्षेच्‍या कारणामुळे पाकमध्‍ये खेळण्‍यास तयार होत नाहीत.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पाक क्रिकेट बोर्डाने भारताला दिली होती धमकी, 'आमच्‍याशी खेळा, अन्‍यथा बहिष्‍कार'