नवी दिल्ली- पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खानने म्हटले की, अटीतटीचया सामन्यात सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली हा जोरदार फलंदाज आहे. क्रिकेटनंतर राजकारणात शिरलेल्या इम्रान यांनी विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले. विराट हा जन्मजात शानदार आणि परीपूर्ण फलंदाज आहे, असेही इम्रान यांनी म्हटले. आणखी काय म्हणाले खान..
- एका मुलाखतीत इम्रान म्हणाले, क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा एक काळ असतो. 1980 च्या दरम्यान विवियन रिचर्ड्स आणि त्यानंतर ब्रायन लारा व सचिन तेंडुलकर यांचा काळ होता. मात्र, विराट सर्वात जास्त परिपूर्ण असा फलंदाज आहे.
- खानने म्हटले- तो केवळ हुशारच नाही, त्याचा स्वभावही चांगला आहे. याबाबतीत तो सचिनहूनही पुढे आहे. विराटने अत्यंत कठीण परिस्थितीत शानदार क्रिकेटचे दर्शन घडवले आहे जे सचिनही करू शकत नव्हता, अशी कामगिरी विराटने उत्कृष्ठपणे पार पाडली आहे.
पाकच्या पराभवाबाबत खेद..
- खानने टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पाकच्या पराभवावर दुख: व्यक्त केले.
- पाकिस्तानला हरताना आमच्याकडून पाहावत नव्हते.
- कोहलीने जोरदार बॅटिंग केली होती. एका बॉलरच्या भूमिकेतून मी हे म्हणत आहे.
- आजच्या तारखेर विराट उत्कृष्ट फलंदाज आहे.
- इम्रान टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतातच होते. तेव्हा त्यांची मोदींसोबत भेट झाली होती.
- यासंदर्भात बोलताना खानने म्हटले- दोन्ही देशातील क्रिकेट टूर्स सुरू व्हायला हवे.