आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाेनीच्या हाेमग्राउंडवर टीम इंडियाला टी-20 त विजयी अर्धशतकाची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- सलगच्या  मालिका विजयाने टीम इंडिया सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता हीच लय अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हाेणाऱ्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतही कायम ठेवण्यासाठी भारताचे खेळाडू उत्सुक अाहे. या दाेन्ही संघांतील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात हाेणार अाहे. सलामीचा सामना रांचीच्या मैदानावर रंगणार अाहे. यातून यजमानांना अापल्या मालिका विजयाच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याची माेठी संधी घरच्या मैदानावर अाहे. भारताने यापूर्वी पाहुण्या अाॅस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकली अाहे. अाता वनडेपाठाेपाठ टी-२० मालिका विजयावर टीम इंडियाची नजर अाहे.   याशिवाय धाेनीच्या हाेम ग्रांऊडवर भारताला टी-२० मध्ये विजयाच्या अर्धशतकाची संधी अाहे. 
 
हार्दिक पांड्याकडून अाशा : वनडे मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याकडून अाता टी-२० सामन्यांतही माेठी अाशा अाहे. त्याच्यावर टीमच्या विजयाची मदार असेल. वनडे मालिकेत ५५.५० च्या सरासरीने २२२ धावांवर ६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गाैरवण्यात अाले. 
 
सरावावर पाणी
यजमान भारतीय संघाने टी-२० सामन्याच्या तयारीसाठी रांचीच्या मैदानावर शुक्रवारी सरावाचा निर्णय घेतला. मात्र, त्यापूर्वीच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे यजमानांच्या सरावावर पाणी फेरले गेले. यातून टीमला सराव न करताच स्टेडियममध्ये बसावे लागले.   
 
टीम इंडियाला विजयी अर्धशतकाची संधी 
यजमान भारताकडे टी-२० मध्ये विजयाचे अर्धशतक पूर्ण करण्याची माेठी संधी अाहे. भारताने या फाॅरमॅटचे ८३ सामने खेळले अाहेत. यात भारताच्या नावे ४९ विजयाची नाेंद अाहे. अाता एका विजयासह भारताला अर्धशतक पूर्ण करता येईल.   
 
संभाव्य संघ
भारत :
विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, लाेकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, नेहरा, अक्षर पटेल.   

अाॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वाॅर्नर, जेसन, डॅन क्रिस्टियन, नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, अॅराेन फिंच, ट्रेव्हिस हेड, हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पाईने, काने रिचर्ड्सन, अॅडम झम्पा.
बातम्या आणखी आहेत...