आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा विक्रमवीर जसप्रीत बुमराह टॉप-5 मध्ये दाखल, कोहली अव्वलस्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - युवा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये साेनेरी यशाचा डबल धमाका उडवला. त्याने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक १५ विकेट घेण्याची विश्वविक्रमी कामगिरी रचली. दुसरीकडे त्याने अायसीसीच्या वनडे क्रमवारीतही नेत्रदीपक यश संपादन केले. त्याने गाेलंदाजीच्या क्रमवारीमध्ये थेट टाॅप-५ मध्ये धडक मारली.   बुमराह अाता ६८७ रेटिंग गुणांसह चाैथ्या स्थानावर अाहे.   
 
विराट काेहली नंबर वन 
अापल्या तुफानी फटकेबाजीने काेहलीने श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका गाजवली. यासह त्याने क्रमवारीतील अापला दबदबा कायम ठेवला. ताे अाता वनडेमध्ये जगातील नंबर वन फलंदाज झाला अाहे.  त्याचे अाता ८८७ गुण झाले. यासह त्याने सचिनच्या विश्वविक्रमी रेटिंग गुणांची बराेबरी साधली.   श्रीलंकेविरुद्ध मालिकेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याला हे घवघवीत यश संपादन करता अाले.     
 
बुमराहची २७ स्थानांनी प्रगती : भारताच्या युवा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने क्रमवारीमध्ये तब्बल २७ स्थानांनी प्रगती साधली. त्याने मालिकेमध्ये सर्वाधिक १५ बळी घेतले. यामुळे त्याला चाैथ्या स्थानावर धडक मारता अाली.  यामध्ये त्याने कागिसाे रबाडाला मागे टाकून चाैथे स्थान गाठले.   
 
टाॅप-५ गाेलंदाज 
१. जाेश हेझलवूड (अाॅस्ट्रेलिया) ७३२  
२. इम्रान ताहिर (द. अाफ्रिका) ७१८  
३. मिशेल स्टार्क (अाॅस्ट्रेलिया) ७०१  
४. जसप्रीत बुमराह (भारत) ६८७  
५. कागिसाे रबाडा (द. अाफ्रिका) ६८५
 
 
टाॅप-५ फलंदाज 
१. विराट काेहली (भारत) ८८७  
२. डेव्हिड वाॅर्नर (अाॅस्ट्रेलिया) ८६१  
३. डिव्हिलर्स (द. अाफ्रिका) ८४७  
४. ज्याे रुट (इंग्लंड) ७९९  
५. बाबर अाझम (पाक) ७८६  
 
 
बातम्या आणखी आहेत...