आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IND Vs AUS: Indian Women Win The T20 Series Against Australia

भारतीय महिलांनी चारली ऑस्ट्रेलियन संघाला धूळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजयी जल्लोष करताना भारतीय संघ. - Divya Marathi
वजयी जल्लोष करताना भारतीय संघ.
मेलबर्न - तीन वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला १० गड्यांनी हरवून भारतीय महिलांनी ३ सामन्यांची टी-२० क्रिकेट मालिका २-० ने जिंकली. भारतीय महिला संघाने प्रथमच ही द्विपक्षीय मालिका आपल्या नावे केली आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस बोलावले. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला १२५ धावांवरच रोखले.

तत्पूर्वी, भारताने सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना दबावात ठेवले. सुरुवातीच्या ५ षटकांतच त्यांचे २ फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, कर्णधार मेग लेनिंगने ४९ आणि जेस जोनासेनने २७ धावा काढल्या. प्लेअर अॉफ द मॅच ठरलेल्या झुलन गोस्वामीने भारताकडून १६ धावांत २ गडी बाद केले. फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने २७ धावांत २ गडी बाद केले.
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस पद्धतीप्रमाणे भारताला १० षटकांत सुधारित ६६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. हे लक्ष्य भारतीय महिला फलंदाजांनी ९.१ षटकांतच गाठले. यात कर्णधार मिताली राजने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. या खेळीत तिने ६ चौकार मारले. स्मृती मानधनाने तिला उत्कृष्ट साथ देत नाबाद २७ धावांची खेळी केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात आतापर्यंत ११ टी-२० सामने खेळले गेले आहेत. त्यात भारताला तिसऱ्यांदाच विजय मिळवता आला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा थरार...