आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IND Vs BAN Asia Cup Final 2016 : Players Comparison

IND vs BAN:भारत सहाव्यांदा चॅम्पियन, बांगलादेशाला नमवून जिंकले 40 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर- भारत आशिया क्रिकेटचा नवा चॅम्पियन बनला आहे. टीम इंडियाने आशिया चषक टी-२० च्या फायनलमध्ये बांगलादेशला ८ विकेटने हरवले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला होता. बांगलादेशने ५ बाद १२० धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताने ७ चेंडू आणि ८ विकेट शिल्लक ठेवून विजय मिळवला. आता ८ मार्चपासून भारतात टी-२० वर्ल्डकपचा रोमांच दिसेल. भारताने याआधी १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१० मध्ये आशिया किताब जिंकला होता.

धवन-कोहलीने ९४ धावा जोडल्या
येथील शेरे बांगला स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना भारताने रोहित शर्माची विकेट अवघ्या ५ धावांवर गमावली. यानंतर शिखर धवन (६०) आणि विराट कोहली (नाबाद ४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. भारताच्या ९९ धावा झाल्या असताना धवन बाद झाला. धवनचा हा टी-२० मधील सर्वोत्तम स्कोअर ठरला. यानंतर कोहली आणि कर्णधार धोनीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. धोनीने ६ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० धावा काढल्या. त्याने विजयी षटकार मारला. धोनीने मैदानावर येऊन गरजेनुसार आक्रमक खेळी करून विजय खेचून आणला.

'दोन दिवसांनंतर टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे. आम्ही यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. या विजयाने आमच्या संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. आम्ही एकसुद्धा सामना गमावला नाही. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी जबाबदारी पार पाडली. बुमराहने उत्तम गोलंदाजी केली. हार्दिक पंड्या या मालिकेतील शोध आहे.'
-धोनी, कर्णधार टीम इंडिया

धावफलक

बांगलादेश धावा चेंडू ४ ६
तामिम पायचीत गो. बुमराह १३ १७ ०२ ०
सरकार झे. पंड्या गो. नेहरा १४ ०९ ०३ ०
शब्बीर रहेमान नाबाद ३२ २९ ०२ ०
सकिब झे. बुमराह गो. अश्विन २१ १६ ०३ ०
मुशाफिकूर रहीम धावबाद ०४ ०५ ०० ०
मुर्तुजा झे. कोहली गो. जडेजा ०० ०२ ०० ०
मोहमुदुल्लाह नाबाद ३३ १३ ०२ २

अवांतर : ३. एकूण : १५ षटकांत ५ बाद १२० धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२७, २-३०, ३-६४, ४-७५, ५-७५. गोलंदाजी : आर. अश्विन ३-०-१४-१, आशिष नेहरा ३-०-३३-१, बुमराह ३-०-१३-१, जडेजा ३-०-२५-१, पंड्या ३-०-३५-०.

भारत धावा चेंडू ४ ६
रोहित झे. सरकार गो. आमिन ०१ ०५ ०० ०
धवन झे. सरकार गो. तस्किन ६० ४४ ०९ १
विराट कोहली नाबाद ४१ २८ ०५ ०
महेंद्रसिंग धोनी नाबाद २० ०६ ०१ २

अवांतर : ००. एकूण : १३.५ षटकांत २ बाद १२२ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-५, २-९९. गोलंदाजी : तस्किन अहेमद ३-०-१४-१, अल-आमिन २.५-०-३०-१, अबू हैदर १-०-१४-०, सकिब-अल-हसन २-०-२६-०, मुशर्रफ मुर्तुजा २-०-१६-०, नासेर हुसेन ३-०-२२-०.