आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND VS SA 1st test: अश्विन-जडेजाने दिले आफ्रिकेला दोन धक्के, स्कोर 9/2

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत पहिल्या डावाच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने केलेल्या 201 धावांच्या उत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत द. आफ्रिकेने दोन विकेटच्या मोबदल्यात 28 धावा केल्या आहेत. डीन एल्गर आणि फाफ डु प्लेसिस क्रीजवर आहेत. डीन एल्गर आणि हाशिम अमला नॉट आउट परतले. पहिल्या डावात आफ्रिकेची सुरूवातही भारताप्रमाणेच खराब झाली. त्यांना पहिला झटका वान जिलच्या रुपात बसला. त्याला आर. अश्विनने 5 धावांवर असतानाच LBW केले. यानंतर थोड्याच वेळात प्लेसिस 0 वर असताना त्याला जडेजाने बोल्ड केले.
आफ्रिकेचा धाव फलक
बॅट्समन धावा चेंडू 4 6
डीन एल्गर not out 13 59 0 0
वान जिल lbw b अश्विन 5 23 1 0
प्लेसिस गो. जडेजा 0 4 0 0
हाशिम अमला not out 9 34 1 0
टीम इंडियाच्या 201 धावा, एल्गरने घेतल्या 4 विकेट्स
तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात 201 धावा केल्या टीम इंडियासाठी मुरली विजयने सर्वाधिक 75 धावा केल्या. त्याच्या शिवाय चेतेश्वर पुजाराने 31 धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने 38 धावांची खेळी केली. द. आफ्रिकेकडून एल्गरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रनॉन फिलॅडरने आणि इमरान ताहिरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या तर रबाडा आाणी हरमरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघाचा धाव फलक
बॅट्समन धावा बॉल 4 6
मुरली विजय lbw b हर्ममर 75 136 12 0
शिखर धवन
झे. अमला गो. फिलांडर 0 4 0 0
चेतेश्वर पुजारा lbw b एल्गर 31 66 6 0
विराट कोहली झे. एल्गर गो. रबाडा 1 4 0 0
अजिंक्य रहाणे झे. अमला गो. एल्गर 15 48 2 0
रिद्धिमान साहा झे. अमला गो. एल्गर 0 1 0 0
रवींद्र जडेजा lbw फिलांडर 38 92 4 0
अमित मिश्रा झे. स्टेन गो. एल्गर 6 8 1 0
आर. अश्विन Not out 20 42 0 0
उमेश यादव गो. इमरान ताहिर 5 7 1 0
वरुण एरॉन गो. इमरान ताहिर 0 3 0 0
भारताने जिंकला टॉस
या आधी भारतीय संघाने आफ्रिके विरूद्ध टॉस जिंकूण प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यातून रोहित शर्माला बाहेर ठेवण्यात आले आहे. तर रवींद्र जडेजाला टीममध्ये जागा मिळाली आहे. टी-20 आणि वन डे मालिकेत झालेल्या पराभवानंतर आता टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीवर ही मालिका जिंकण्याचा दबाव असेल.
आफ्रिकन संघ चांगलाचा फॉर्मात
वनडे आणि टी-20 या दाेन्ही मालिकांमध्ये जबर्दस्त विजया नंतर आफ्रिकन संघ चांगलाच फॉर्मात आहे. आधीच्या दोन्ही मालिका जिंगल्यानंतर आता आफ्रिकन संघ कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्रिक नोंदवीन्यासाठी मैदानावर उतरेल. त्यामुळे काेहलीच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.
संघ असे-
टीम इंडिया : शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, वरूण आरोन, आर. अश्विन.
* दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर, स्टेन वान जिल, फाफ डु प्लेसिस, हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, डेन विलास, वर्नोन फिलांडर, सिमोन हार्मर, डेल स्टेन, रबाडा, इमरान ताहिर.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याशी संबंधित काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...