आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Ind Vs WI, India Tour Of West Indies, Only T20I: West Indies V India At Kingston

T-20 : वेस्ट इंडीजकडून भारताचा पराभव, विंडीजने 9 गडी राखून जिंकला सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन, जमैका - कसाेटी मालिका पराभवातून सावरलेल्या यजमान वेस्ट इंडीजने रविवारी एकमेव टी-२० सामन्यात टीम इंडियाला धूळ चारली. यजमान विंडीजने घरच्या मैदानावर ९ गड्यांनी सामना जिंकला. सलामीवीर इव्हिन लेविसच्या (१२५) झंझावाती नाबाद शतकाच्या बळावर विंडीजने सहज विजयश्री खेचून अाणली. यासाठी मार्लाेस सॅम्युअल्सने नाबाद ३६ अाणि स्फाेटक फलंदाज क्रिस गेलने १८ धावांचे याेगदान दिले. 

 टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९० धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये यजमान विंडीजने एका गड्याच्या माेबदल्यात १८.३ षटकांत लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला सलामीवीर क्रिस गेल अाणि लेविसने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी संघाला ८२ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. त्यानंतर लेविस व सॅम्युअल्सने विजयश्री खेचून अाणली.

तत्पूर्वी,भारताकडून विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने सर्वाधिक ४८ धावांचे योगदान दिले. युवा खेळाडू ऋषभ पंतने ३८ धावा काढल्या. वेस्ट इंडीजने टॉस जिंकून प्रथम  गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून कोहली (३९) आणि धवन (२३) यांनी ५.३ षटकांत ६४ धावांची सलामी दिली. कोहलीने २२ चेंडूंत १ षटकार, ७ चौकारांसह ३९ धावा काढल्या.
 
पुढील स्लाइडवर धावफलक...
बातम्या आणखी आहेत...