आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाफ्रिकेला नमवून भारत अ अंतिम फेरीत, मयंक अग्रवाल सामनावीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- पराभवाच्या गर्तेतून यशस्वीपणे बाहेर पडत भारत अ संघाने गुरुवारी तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये धडक मारली. उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात यजमान भारताने घरच्या मैदानावर दक्षिण अाफ्रिका अ संघाचा पराभव केला. यजमानांनी ३४ धावांनी विजय संपादन केला.
मयंक अग्रवाल (१७६), मनीष पांडे (नाबाद १०८) अाणि अक्षर पटेल (३/३२) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने विजय संपादन केला. मयंक अाणि मनीष पांडे यांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीतून भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना अाफ्रिकेसमाेर ३७२ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात दक्षिण अाफ्रिकेने अक्षर पटेलच्या धारदार गाेलंदाजीपुढे सपशेल गुडघे टेकले. यातूनच अाफ्रिकेला ३३७ धावांत अापला गाशा गुंडाळावा लागला. या वेळी डिकाॅक (११३) अाणि हेंडरिक्स (७६) यांनी केलेली १२८ धावांच्या भागीदारीची खेळी व्यर्थ ठरली. खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या डिकाॅक अाणि डेेलपाेर्टने दमदार सुरुवात करून दिली. या दाेघांनी टीमला अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली.

मयंक, मनीष चमकले
विजयात मयंक व मनीष पांडे चमकले. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी २०३ धावांची भागीदारी केली. मयंकने १३३ चेंडूंत १७६ धावा काढल्या. यात २० चाैकार व पाच षटकार अाहे. मनीषने ८५ चेंडत अाठ चाैकार व दाेन षटकारांच्या अाधारे १०८ धावा काढल्या.