आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर धवनची १५० धावांची धडाकेबाज खेळी : बांगलादेश अ संघ अडचणीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनची १५० धावांची धडाकेबाज खेळी तसेच विजय शंकर (८६) आणि करुण नायर (७१) यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारत अ संघाने आपली स्थिती मजबूत केली. बांगलादेश अ संघाविरुद्ध तीनदिवसीय सामन्यात भारत अ संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद ४११ धावांवर डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात बांगलादेश अ संघाने दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावा काढल्या होत्या. बांगलादेश अ संघाने भारत अ संघाविरुद्ध वनडे मालिका २-१ ने गमावली होती. यानंतर रणजी चॅम्पियन कर्नाटकविरुद्धसुद्धा तीनदिवसीय सामन्यात त्यांचा पराभव झाला. आता या सामन्यातही पराभवाचे संकट त्यांच्यापुढे उभे आहे.
बांगलादेश अ संघाला डावाने पराभव टाळण्यासाठी अजून १४७ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ २३ षटकांआधीच थांबवण्यात आला. खेळ थांबला त्या वेळी बांगलादेश अ संघाकडून कर्णधार मोमिनुल हक ९ आणि लिंटन दास ७ धावांवर खेळत होते.

तत्पूर्वी सकाळी भारत अ संघाने १ बाद १६१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी कर्णधार धवन ११६ तर श्रेयस अय्यर ६ धावांवर खेळत होते. कर्णधार धवनने भारताच्या ४११ धावा झाल्यानंतर डाव घोषित केला. भारत अ संघाने रविवारी आपल्या स्कोअरमध्ये २५० धावा जोडल्या. शिखर धवनने १५० धावा काढल्या. करुण नायरने ७१ तर विजय शंकरने ८६ धावा जोडल्या.

संक्षिप्त स्कोअर
बांगलादेश अ पहिला डाव २२८. भारत अ पहिला डाव ५ बाद ४११ (डाव घोषित). बांगलादेश दुसरा डाव २ बाद ३६ धावा.