आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tesst Match: India A Team Won By One Game And 32 Runs

बांगलादेश अ संघावर युवा ब्रिगेडचा विजय, एक डाव आणि ३२ धावांनी केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - ईश्वर पांडे (२८ धावांत ३ विकेट) आणि जयंत यादव (४८ धावांत ३ विकेट) यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर भारत अ संघाने एकमेव अधिकृत नसलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी विजय मिळवला. भारत अ संघाने पाहुण्या बांगलादेश अ संघाला नमवले. पाहुण्या बांगलादेश अ संघाला भारताच्या युवा ब्रिगेडपुढे आव्हान ठेवता आले नाही.
भारत अ संघाने बांगलादेश अ संघाला दुसऱ्या डावात ३९.३ षटकांत १५१ धावांच्या छोट्या स्कोअरवर गुंडाळून एक डाव आणि ३२ धावांनी मोठा विजय मिळवला. भारत अ संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच पकड मजबूत केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह सजलेल्या बांगलादेश अ संघाकडून मजबूत आव्हान मिळेल, असे वाटत होते. मात्र, तसे घडले नाही. भारतीय गोलंदाजांसमोर पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सकाळच्या पहिल्या सत्रातच बांगलादेशला पराभवाने जवळ केले.

बांगलादेशकडून मोमिनूल हकने सर्वाधिक ५४ धावा जोडल्या. याशिवाय लिंटन दासने ३८ धावांचे योगदान दिले. शफिऊल इस्लामने २१, तर जुबेर हुसेनने १३ धावा काढल्या. त्यांच्या पाच फलंदाजांना तर दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही.