आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India A VS Bangaladesh A Match Starts From Today

भारत अ VS बांगलादेश अ आजपासून लढत, शिखर, जडेजावर असेल लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- भारत अ आणि बांगलादेश अ संघात तीनदिवसीय क्रिकेट सामन्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. या सामन्यात शिखर धवन आणि रवींद्र जडेजा खेळणार आहेत. धवन दुखापतीतून सावरला असून जडेजा सुमार फॉर्मशी संघर्ष करीत आहे. यामुळे या लढतीत दोघांच्या कामगिरीवर लक्ष असेल.

धवनने बांगलादेश आणि श्रीलंका दौऱ्यात सलग दोन सामन्यांत शतके ठोकली आहेत. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या वेळी त्याच्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्या या हाताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच दुखापत झाली होती. शिखर धवनने तीनदिवसीय सामन्याच्या तयारीसाठी सिमेंटच्या खेळपट्टीवर ओल्या टेनिस बॉलने बाउन्सरने सराव केला. रवींद्र जडेजासुद्धा कठीण सरावानंतर मैदानावर उतरेल. कसोटी संघात पुन्हा स्थान मिळवणे त्याच्यासाठी कठीण आहे. मात्र, संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रवींद्र जडेजाला सिद्ध करण्यासाठी एक संधी दिली आहे. जडेजाने या तीनदिवसीय सामन्यांत चांगली कामगिरी केली तर द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांतील अखेरच्या दोन वनडेसाठी तरी त्याची निवड शक्य आहे. वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन आणि नमन ओझासुद्धा दमदार प्रदर्शन करण्यास आतुर असतील. नमन ओझालाही स्वत:ची जागा मजबूत करण्याची संधी असेल.
बांगलादेशची टीम मजबूत
म्हैसूर येथे कर्नाटकविरुद्ध प्रथम श्रेणीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर बांगलादेश अ संघ विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशची टीम यजमान संघाला जोरदार प्रत्युत्तर देण्यास आतुर असेल. बांगलादेशकडे रुबेल हुसेन आणि अल अमीनसारखे प्रतिभावंत गोलंदाज आहेत.
भारत अ संघ
शिखर धवन (कर्णधार), वरुण अॅरोन, बाबा अपराजित, श्रेयस घोषाल, श्रेयस अय्यर, एस. जॅक्सन, रवींद्र जडेजा, अभिमन्यू मिथुन, अभिनव मुकुंद, करुण नायर, नमन ओझा, ईश्वर पांडे, विजय शंकर, जयंत यादव.

बांगलादेश अ संघ
मोमिनुल हक (कर्णधार), नासिर हुसेन, अल अमीन हुसेन, अमानुल हक, अराफत सनी, जुबेर हुसेन, कमरूल इस्लाम रब्बी, लिंटन दास, रोनी तालुकदार, रुबेल हुसेन, शब्बीर रहमान, सकलेन साजिब, शफिउल इस्लाम, शुवाग्ता होम, सौम्य सरकार.