आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्राॅफीत प्रथमच टीम इंडियाचा बांगलादेशशी सामना, फायनलसाठी होणार लढत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - गतचॅम्पियन्स भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशाशी दोन हात करेल. स्पर्धेच्या १९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा दोन्ही संघ समोरासमोर असतील. असे असले तरीही आयसीसीच्या वनडे स्पर्धेत नॉकआऊटमध्ये दुसऱ्यांदा टीम इंडियासमोर बांगलादेशचे आव्हान असेल. २०१५ विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने बांगलादेशला १०९ धावांच्या अंतराने हरवले होते.  
 
कोहली ८००० धावांच्या समीप : आयसीसी क्रमवारीत नंबर वन फलंदाज विराट कोहलीकडे या सामन्यात वनडेत ८००० धावांचा टप्पा गाठण्याची संधी असेल. विराटच्या नावे आतापर्यंत १८२ वनडेत ५३.८२ च्या सरासरीने ७९१२ धावा आहेत. वनडेत ८००० धावा पूर्ण करण्यासाठी विराटला ८८ धावांची गरज आहे.   
 
युवराजचा ३०० वा वनडे : भारताच्या युवराजसिंगचा हा ३०० वा वनडे सामना असेल. द. आफ्रिकेविरुद्धचा स्पर्धेतील सामना युवराजचा २९९ वा वनडे होता. युवीने २००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतच वनडे पदार्पण केले होते. १७ वर्षांत युवीने २९९ वनडेत ८६२२ धावा काढल्या. यात १४ शतके आहेत. याशिवाय त्याने १११ विकेट, ९३ झेल घेतले. युवराज सध्या वनडेत ब्रायन लारा (२९९) च्या बरोबरीत आहे. त्याच्या पुढे शॉन पॉलक (३०३), अरविंद डिसिल्वा (३०८), सौरव गांगुली (३११), वास (३२२), स्टीव्ह वॉ (३२५), कॅलिस (३२८), दिलशान (३३०), अझरुद्दीन (३३४), राहुल द्रविड (३४४), मुरलीधरन (३५०), वसीम अक्रम (३५६), पाँटिंग (३७५), इंझमाम (३७८), आफ्रिदी (३९८), संगकारा (४०४), जयसूर्या (४४५), जयवर्धने (४४८), तेेंडुलकर (४६३) हे खेळाडू आहेत.

दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, बुमराह, भुवनेश्वर कुमार, मो. शमी, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे.  

बांगलादेश : मुशर्रफ मुर्तुजा (कर्णधार), तमीम इक्बाल, इमरुल कायेस, सौम्य सरकार, शब्बीर रहेमान, मोहमुदुल्लाह, सकिब-अल-हसन, मुशाफिकूर रहिम, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रहेमान, तस्किन अहेमद, मेहंदी हसन मिराज.

हेड टू हेड  
चॅम्पियन्स ट्रॉफी : पहिल्यांदा होणार भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना.  
आयसीसी वनडे स्पर्धा : ०३ सामने, ०२ भारत विजय, ०१ बांगलादेश विजयी.  
एकूण वनडे सामने : ३२ सामने, २६ भारत विजय, ०५ बांगलादेश विजयी, ०१ नो रिझल्ट.
बातम्या आणखी आहेत...