आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बांगलादेश भारतात प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने बांगलादेश संघाला भारतात कसोटी खेळण्यासाठी अखेर निमंत्रण दिले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी 2017 मध्ये बांगलादेश क्रिकेट टीम भारतात एकमेव कसोटी सामना खेळेल. वर्ष 2000 मध्ये कसोटी दर्जा मिळाल्यापासून बांगलादेशचा भारतातील हा पहिलाच कसोटी दौरा असेल. हैदराबादमधील राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच 8 ते 12 फेब्रुवारी, 2017 या दरम्यान ही कसोटी खेळवली जाईल.
- याबाबतची घोषणा करताना बीसीसीआय प्रेसिडेंट अनुराग ठाकुर यांनी सांगितले की, जो देश कसोटी क्रिकेट खेळतो त्यांच्यासोबत आपणही क्रिकेट खेळले पाहिजे.
- ठाकूर म्हणाले, ‘कसोटी क्रिकेट खेळणा-या देशात भारत खूपच वरच्या स्तरावर आहे. अशावेळी बीसीसीआयची जबाबदारी वाढते की, अशा सर्व देशांसमवेत कसोटी क्रिकेट खेळले पाहिजे जे कसोटी खेळतात.
- ही एक चांगली सुरुवात आहे की, आपण पुढील वर्षी एक कसोटी आयोजित करू शकलो.
- तिकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) चे प्रेसिडेंट नजमुल हसन यांनीही बीसीसीआयच्या पुढाकाराबाबत आनंद व्यक्त केला आहे.
- हसन म्हणाले, ‘छोटा दौराही आमच्या खेळाडूंना आणि फॅन्सला खूपच चांगला अनुभव देईल.
- ‘मागील काही दिवसात भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी-20 मध्ये चांगले क्रिकेट पाहायला मिळाले आहे.
- ‘आम्हाला आशा आहे की, कसोटी क्रिकेटमध्येही दोन्ही देश चांगली लढत देतील आणि प्रेक्षकही आनंद लुटतील.
- ‘भारताविरोधात त्यांच्या घरी कसोटी खेळण्याची प्रतिक्षा आता संपली आहे. हे सेलिब्रेशन करण्याची वेळ आहे' असेही हसन म्हणाले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...