आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारदिवसीय कसोटी क्रिकेट: अाॅस्ट्रेलिया अ संघाच्या पहिल्या डावात २६८ धावा अाेझा, मिश्राचा दणका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- भारतीय अ संघाच्या प्रग्यान अाेझा (५/८५) अाणि अमित मिश्राने (३/५५) यांनी पाहुण्या अाॅस्ट्रेलिया अ संघाला चारदिवसीय अधिकृत नसलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दणका दिला. त्यामुळे पाहुण्या टीमला अवघ्या २६८ धावांत अापला पहिला डाव गुंडाळावा लागला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय अ संघाने घरच्या मैदानावरील अापला दबदबा कायम ठेवताना तिसऱ्या दिवसअखेर शुक्रवारी तीन बाद १२१ धावा काढल्या. करुण नायर (४) अाणि श्रेयस अय्यर (४) मैदानावर खेळत अाहेत. यासह यजमान संघाला एकूण १५४ धावांची अाघाडी घेता अाली. यापूर्वी भारतीय अ संघाला पहिल्या डावात ३३ धावांची अाघाडी मिळाली.

श्रीलंका दाैऱ्यासाठी दुर्लक्षित केल्यानंतरही फिरकीपटू प्रग्यान अाेझाने स्वत:ला सिद्ध करण्याची एकही संधी साेडली नाही. त्यामुळे त्याला पाच विकेट घेता अाल्या. या वेळी अमित मिश्राने ५५ धावा देत ३ बळी घेतले.

भारतीय अ संघाकडून दुसऱ्या डावात लाेकेश राहुल अाणि अभिनव मुकुंदने दमदार सुरुवात केली. या दाेघांनी संघाला ३९ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. दरम्यान, हेड याने ही जाेडी फाेडली. त्याने सलामीच्या लाेकेश राहुलला (२९) झेलबाद करून संघाला महत्त्वाचा बळी मिळवून दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने डाव सावरला.

तत्पूर्वी अाॅस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी चार बाद १८५ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. पीटर हँड‌‌्सकॉम्ब (७५) व स्टोनिसने (४२) धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला. शतकापासून अवघ्या ९ धावांवर असलेल्या पीटरला भारताच्या अमित मिश्राने बाद केले. त्याने १८२ चेंडूंचा सामना करताना ९१ धावा काढल्या. यात सात चाैकारांचा समावेश अाहे. त्यानंतर मिश्राने मॅथ्यू वेडला (२) बाद केलेे. यादवने सीन एबाेटला धावबाद केले.

मुकुंद-पुजाराची अर्धशतकी भागीदारी
दुसऱ्या डावात पुजारा व मुकुंद यांनी अापला दबदबा निर्माण केला. पाहुण्या टीमची गाेलंदाजी फाेडून काढत या दाेघांनी संघाच्या धावसंख्येला गती दिली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी शानदार ७१ धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या १ बाद ११० असताना मुकुंद तंबूत परतला. त्याने ११६ चेंडूंत चार चाैकारांसह ४० धावा काढल्या. मात्र, त्याला मूळ भारतीय वंशाचा असलेल्या गुरविंदर संधूने झेलबाद केले. त्यानंतर पुजाराही बाद झाला. त्याने ९२ चेंंंडूंत पाच चाैकारांसह ४२ धावा काढल्या.
०५ विकेट प्रग्यान अाेझाच्या
०३ बळी मिश्राने घेतले
१५४ धावांची भारताला अाघाडी