आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम इंडियाची विजयादशमी थाटात; 48 वर्षांचा विक्रम मोडत न्यूझीलंडवर सर्वात मोठा विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - टीम इंडियाने होळकर स्टेडियमवर तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडला ३२१ धावांनी पराभूत करून मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केले. भारताने आपल्या ४८ वर्षांच्या इतिहासात चौथ्यांदा तीन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केले. सामना संपल्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कसोटीत नंबर वन बनल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला कसोटीची गदा सोपवली.
धावांच्या अंतराने भारताचा हा न्यूझीलंडवर सर्वात मोठा विजय ठरला, तर भारताच्या कसोटी इतिहासात हा दुसरा मोठा विजय आहे. भारताने याआधी मार्च १९६८ मध्ये न्यूझीलंडला ऑकलंड येथे २७२ धावांनी हरवले होते. यानुसार भारताने न्यूझीलंडवर धावांच्या अंतराने सर्वांत मोठा विजयाचा ४८ वर्षांचा आपला जुना विक्रम मोडला. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर हा पहिला कसोटी सामना होता. भारताने या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजेय राहण्याचा आपला विक्रम कायम ठेवला. भारताने याआधी होळकर स्टेडियमवर झालेले चारही वनडे जिंकले होते.
भारताने सकाळी चेतेश्वर पुजाराच्या (नाबाद १०१) शानदार शतकाच्या आणि गौतम गंभीरच्या (५०) अर्धशतकाच्या बळावर बाद २१६ धावा काढून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीसह भारताने न्यूझीलंडपुढे ४७५ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. दोन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या गौतम गंभीरने ५० धावांचे योगदान दिले. यानंतर न्यूझीलंड संघाला फिरकीपटू आर. अश्विनने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवले. न्यूझीलंडने फिरकीपुढे अवघ्या ४४.५ षटकांत १५३ धावांत गुडघे टेकले. अश्विनने ५९ धावांत गडी बाद केले.
भारताच्या मालिकेत तब्बल २०४३ धावा
{ २०४३ धावा भारताने मालिकेत काढल्या. न्यूझीलंडपेक्षा ३४ टक्के अधिक. न्यूझीलंडने केवळ १३५१ धावा काढल्या.
{ ३७३ धावा पुजाराने या मालिकेत ७५ च्या सरासरीने काढल्या. भारतीय संघाच्या १८.२२ टक्के धावा.
{ ६० विकेट भारतीय गोलंदाजांनी घेतल्या. न्यूझीलंडपेक्षा २८.३३ टक्के अधिक. न्यूझीलंडने केवळ ४३ िवकेट घेतल्या. भारतीय गोलंदाज चमकले.
टीम इंडियाचे ११५ गुण; नंबर वनचे स्थान अधिक मजबूत !
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देणाऱ्या टीम इंडियाने अाता कसोटी क्रमवारीतील अापले नंबर वनचे स्थान अधिक मजबूत केले. भारताने ३-० ने मालिका जिंकली. आता भारताचे क्रमवारीत ११५ गुण झाले अाहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या पाकच्या नावे १११ गुण अाहेत. अाता विंडीजविरुद्धची कसाेटी मालिका ३-० ने जिंकली तरीही पाकचे क्रमवारीत ११२ गुण हाेतील.
विजयादशमीला विराट गदाधारी
टीमइंडियाचा कर्णधार िवराट कोहलीला सामन्यानंतर आयसीसीकडून सुनील गावसकर यांनी कसोटी क्रमवारीत नंबर वनची गदा प्रदान केले.
अश्विनची कारकीर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी
पहिल्या डावात ८१ धावांत गडी बाद करणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावात न्यूझीलंडला धक्के देताना १३.५ षटकांत ५९ धावांत गडी बाद केले. अश्विनने कसोटी करिअरमध्ये सहाव्यांदा एका सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याने या सामन्यात एकूण १३ गडी बाद केले. यानुसार अश्विनने करिअरची सर्वोत्तम कामगिरी केली. या सामन्याआधी त्याची सर्वोत्तम कामगिरी ६६ धावांत िवकेट आणि सामन्यात ८५ धावा आणि १२ विकेट अशी होती. त्याने न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात ५९ धावांत विकेट घेतल्या, तर सामन्यात १४० धावांत १३ गडी बाद केले.
विराट कोहलीच्या नेतृत्वात सलग चौथा मालिका विजय
कोहलीच्या नेतृत्वात भारताने सलग चौथी मालिका जिंकली आहे. कोहीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर २-१ ने, नंतर द. आफ्रिकेला भारतात ३-० ने, तर वेस्ट इंडीजला त्यांच्या घरच्या मैदानात २-० ने हरवले. यानुसार कोहलीने आपल्या नेतृत्वात १० कसोटी सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडची नववी विकेट ३५ व्या षटकात १३८ च्या स्कोअरवर पडली होती. मात्र, बी. जे. वॉटलिंग आणि ट्रेंट बोल्टने अखेरच्या विकेटसाठी १०.१ षटके खेळपट्टीवर टिकून खेळ केला. या दोघांनी भारताच्या विजयाची प्रतीक्षा वाढवली. दिवसाचे अखेरचे षटक सुरू होते आणि सामना पाचव्या दिवशी ढकलला जाईल, असे वाटत होते. मात्र, दिवसाच्या अखेरच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अश्विनने बोल्टला झेलबाद करून देशातील चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली.
इंदुरात न्यूझीलंडला हरवल्यानंतर आयसीसी क्रमवारीत नंबर वन झालेल्या टीम इंडियाने गदेसह अशी पोज दिली.
किवींनी फिरकीपुढे गुडघे टेकले
न्यूझीलंडकडूनदुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला अर्धशतकसुद्धा ठोकता आले नाही. त्यांच्याकडून रॉस टेलरने सर्वाधिक ३२ धावांचे योगदान दिले. मार्टिन गुप्तिलने २९, कर्णधार केन विल्यम्सनने २७, तर बी. जे. वॉटलिंगने नाबाद २३ धावा काढल्या. इतरांनी सपशेल निराशा केली. लँथम ६, ल्यूक रोंची १५, निशाम ०, सँटनर १४, जितेन पटेल ०, मॅट हेनरी ०, तर टीम बोल्ट धावा काढून बाद झाले.
एका मालिकावीरासाठी सरासरी किती कसोटी
रविचंद्रन अश्विन ५.७१
रिचर्ड हॅडली १०.७५
इम्रान खान ११.००
मुथय्या मुरलीधरन १२.०९
वसीम अक्रम १४.८५
शेन वॉर्न १८.१२
सचिन तेंडुलकर ४०.००
वीरेंद्र सेहवाग २०.८
{ न्यूझीलंडविरुद्ध एका मालिकेत ६० वर्षांत सर्वाधिक बळी घेणारा पहिला भारतीय ठरला अश्विन. १९५५-५६ मध्ये सुभाष गुप्तेने सामन्यांत ३४ बळी घेतले होते. न्यूझीलंडचा कर्णधार चारही वेळा अश्विनचा बळी ठरला.
{ तीन सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा १० पेक्षा अधिक गडी बाद करणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. हरभजनने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध असे केले होते.
{ अश्विनने सलग तिसऱ्यांदा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. असा करणारा तो तिसराच खेळाडू आहे. त्याच्याआधी इम्रान खान, माल्कम मार्शल यांनी असे केले होते.
{ अश्विनने पदार्पण केले तेव्हापासून भारताने मालिका जिंकल्या आहेत. यात वेळा अश्विन तर एक वेळा रोहित शर्मा मालिकावीर बनला. अश्विनने २०११ मध्ये पदार्पण केले तेव्हापासून एकाही खेळाडूने चारपेक्षा अधिक मालिकावीर अवाॅर्ड जिंकलेला नाही.
३९ कसोटीत २२० िवकेट, सर्वाधिक : अश्विन३९ कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्या नावे २२० विकेट आहेत. चार्ली ग्रिमेट (३७ कसोटी, २१६ बळी) दुसऱ्या तर वकार युनूस (३९ कसोटी २०८ विकेट) तिसऱ्या स्थानी आहे. अश्विनने कारकीर्दीत २१ व्यांदा पेक्षा अधिक गडी बाद केले.
विराट कोहलीने केला विक्रम...
- सर्वात जास्त कसोटी जिंकण्यात कर्णधार विराट कोहलीने सुनील गावस्कर आणि नवाब पटौदी यांना मागे टाकले आहे.
- या विजयामुळे विराटने कसोटी संघाच्या कर्णधारांमध्ये चौथे स्थान पटकावले आहे. तर अव्वल स्थानी एमएस धोनी आहे.
- विराटच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 17 कसोटी सामने खेळले आहे. त्यापैकी 10 जिंकले, 2 गमावले तर 5 सामने अनिर्णित ठरले होते.

असा झाला न्युझीलंडचा पराभव....
- टीम इंडियाने विजयासाठी न्यूझीलंडसमोर 474 धावांचे आव्हाण ठेवले होते. पण मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला पहिला धक्का 7 धावांवर बसला.
- टॉम लाथमला उमेश यादव याने एल्बीडब्ल्यू आऊट केले. टॉम 6 धावांवर खेळत होता.
- टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अश्विनने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. अश्विनने कर्णधार केन विल्यम्सनला एल्बीडब्ल्यू आऊट करून तंबूत पाठवले.
- तिसरे विकेट देखील अश्विननेच घेतले. त्याने रॉस टेलरला क्लीन बोल्ड केले. टेलरने 32 धावा केल्या.
- 23 व्या षटकात अश्विन याने ल्यूक रॉन्चीला बोल्ड केले.
- नंतर 24 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नीशाचा कोहलीने झेल घेतला. 26 व्या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर जडेजाने गुप्टिलला एल्बीडब्ल्यू आऊट केले.

4 वर्षात गंभीरची कसोटीत अर्धशतक...
- गंभीरने 5 डिसेंबर, 2012 ला कोलकाता येथे इंग्लंडविरोधात अर्धशतक ठोकले होते. गंभीरने 60 धावा केल्या होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी इंदूर कसोटीत गंभीरने अर्धशतक ठोकले.
आर. अश्विनने सीरीजमध्ये घेतले 27 विकेट
- कसोटीचा तिसरा दिवस स्पिनर आर अश्विनच्या नावाने राहिला.
- अश्विनने 6 विकेट घेतले. 2 फलंदाजांना पायचित केले.
- न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत अश्विनने सीरीजमध्ये घेतले 27 विकेट घेतले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सामन्याचे काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...