आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुवनेश्वरची भारतीय कसोटी संघात निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंडविरुद्ध मालिकेतील पुढच्या तीन कसोटी सामन्यांसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरला वगळण्यात आले असून मुरली विजय आणि लोकेश राहुलच्या रूपाने दोन सलामीवीर संघात आहेत. विशाखापट्टनम येथेच गंभीरला दिल्लीकडून रणजी खेळण्यासाठी सोडण्यात आले होते. दिल्लीकडून राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात त्याला केवळ १० धावा काढता आल्या. शिखर धवन दुखापतीतून सावरला असून त्याने ३८ धावा केल्या. मात्र, या दोघांना कसोटी संघात स्थान मिळू शकले नाही. धवनला मॅच फिटनेस आणि फॉर्म सिद्ध करण्यासाठी आणखी दोन सामने खेळावे लागतील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

पुढच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मो. शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या.
बातम्या आणखी आहेत...