आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Clean Swip To Zimbabwe, 3rd ODI Zimbabwe Lost Match At Harare

टीम इंडियाचे क्लीन स्विप! तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेवर ८३ धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिभाभाने लगावलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करताना भुवनेश्वर कुमार. - Divya Marathi
चिभाभाने लगावलेला शॉट रोखण्याचा प्रयत्न करताना भुवनेश्वर कुमार.
हरारे - सहाव्या क्रमांकावर आलेल्या महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधवने (१०५) ठोकलेल्या नाबाद शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत यजमान झिम्बाब्वेला ८३ धावांनी नमवले. या विजयासह क्लीन स्विप करताना टीम इंडियाने ही मालिका ३-० ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २७६ धावा काढल्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला ४२.४ षटकांत १९३ धावांत गुंडाळले. दोन्ही संघात पहिला टी-२० सामना १७ जुलै रोजी होईल.

धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून सलामीवीर चिभाभाने सर्वाधिक ८२ धावा काढल्या. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. चक्वाब्वाने २७, चिगुम्बुराने १०, मुतुम्बामीने २२ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज अपयशी ठरले. भारताकडून बिन्नीने ५५ धावांत ३ विकेट तर मोहित शर्मा, हरभजनिसंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने केदार जाधवचे दमदार शतक (नाबाद १०५) आणि मनीष पांडेच्या (७१) अर्धशतकाच्या बळावर ५० षटकांत ५ बाद २७६ धावा काढल्या. झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे दोन्ही सलामीवीर ३३ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतले. सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने २२ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या साह्याने १५ धावा काढल्या. मॅडझिवने त्याला उत्सयाकरवी झेलबाद केले. मुरली विजयचा अडथळा मॅडझिवनेच दूर केला. मुरली विजयने २१ चेंडूंत २ चौकारांसह १३ धावा काढल्या.
भारताने या सामन्यासाठी जखमी अंबाती रायडूच्या जागी मनिष पांडे तर धवल कुलकर्णीच्या जागी मोहित शर्माला संधी दिली. ही निवड योग्य ठरली. मनिषने ७१ धावा तर मोहितने २ गडी बाद केले.
उथप्पा, तिवारी पुन्हा फ्लॉप
या सामन्यात रॉबिन उथप्पाला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. मात्र, रॉबिन उथप्पा या वेळीसुद्धा अपयशी ठरला. उथप्पाने ४४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकारांच्या मदतीने ३१ धावा काढल्या. चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला मोठी खेळी करता आली नाही. मसकदजाने त्याला बाद केले. चौथ्या क्रमांकावर खेळण्यास आलेल्या मनोज तिवारीला १० धावाच काढता आल्या. उत्सयाने स्वत:च्या गोलंदाजीवर त्याला झेलबाद केले.
केदार तळपला
भारतीय संघ ४ बाद ८२ धावा असा संकटात सापडला असताना पहिला वनडे खेळणारा मनीष पांडे आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी करून संकटाचे ढग दूर पळवले. मनीष पांडेने पहिल्या वनडेत अर्धशतक ठोकले. त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार, १ षटकारासह ७१ धावा काढल्या. केदार जाधवने तर शतक ठोकले. केदारने अवघ्या ८७ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने आक्रमक फलंदाजी करताना नाबाद १०५ धावा ठोकल्या. केदारच्या फलंदाजीमुळे भारताला २७६ धावांचा टप्पा गाठता आला. पांडे बाद झाल्यानंतर बिन्नीने ८ चेंडूंत २ चौकार, १ षटकार ठोकत नाबाद १८ धावांचे योगदान दिले.
धावफलक
भारत धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. उत्सया गो. मॅडझिव १५ २२ १ ०
विजय झे. मुतुम्बामी गो मॅडझिव १३ २१ २ ०
उथप्पा झे. चिगुम्बुरा गो. मसकदजा ३१ ४४ ३ ०
तिवारी झे. व गो. उत्सया १० ३३ ० ०
मनिष पांडे झे. राजा गो. चिभाभा ७१ ८६ ४ १
केदार जाधव नाबाद १०५ ८७ १२ १
स्टुअर्ट बिन्नी नाबाद १८ ०८ २ १
अवांतर : १३. एकूण : ५० षटकांत ५ बाद २७६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२५, २-३३, ३-६८, ४-८२, ५-२२६.
गोलंदाजी : तिरिपानो ८-०-४६-०, मॅडझिव ९-०-५९-२, चिभाभा ८-०-५५-१, मसकदजा १०-०-३१-१, उत्सया १०-०-४१-१, क्रेमर ५-०-४२-०.

झिम्बाब्वे धावा चेंडू ४ ६
मदकदजा पायचित गो. मोहित ०७ २४ १ ०
चिभाभा झे. केदार गो. बिन्नी ८२ १०९ ७ ०
चक्वबा त्रि. गो. अक्षर २७ ४३ ३ ०
चिगुम्बुरा पायचित गो. विजय १० १४ २ ०
मुतुम्बामी पायचित गो. बिन्नी २२ २४ ३ ०
सिकंदर राजा त्रि. गो. हरभजन १३ १० २ ०
वॉलर झे. रहाणे गो. बिन्नी ०५ ०८ ० ०
क्रेमर झे. रहाणे गो. हरभजन ०० ०१ ० ०
उत्सया झे. उथप्पा गो. मोहित ०० ०२ ० ०
तिरिपानो नाबाद १३ १३ २ ०
मॅडझिव यष्टीचीत गो. अक्षर ०३ ०९ ० ०
अवांतर :११. एकूण : ४२.४ षटकांत सर्वबाद १९३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१६, २-८६, ३-९७, ४-१५०, ५-१६०, ६-१७२, ७-१७२, ८-१७६, ९-१७६, १०-१९३.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ६-१-१२-०, मोहित शर्मा ७-०-३३-२, स्टुअर्ट बिन्नी १०-१-५५-३, हरभजन १०-०-३५-२, अक्षर पटेल ६.४-०-३९-२, मुरली विजय ३-०-१९-१.