आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Cricket Team Reach At The Cricketer Umesh Yadav's Home For Dinner Party

उमेश यादवने नव्या घरी दिली टीम इंडियाला डिनर पार्टी, पत्नीसह पोहोचला रहाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी राधिकासह अजिंक्य रहाणे. - Divya Marathi
पत्नी राधिकासह अजिंक्य रहाणे.
नागपूर- भारतीय संघाच्या खेळडूंनी सोमवारी रात्रीचे डिनर क्रिकेटर उमेश यादवच्या घरी घेतले. उमेश यादवने नुकताच शिवाजी नगरमध्ये नवीन फ्लॅट घेतला आहे, या मुळे या डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संघाचे सर्व खेळडू साधारणपणे रात्री 8 वाजता उमेशच्या घरी पोहोचले. अजिंक्य रहाणे यावेळी पत्नीसह दिसून आला. रहाणे शिवाय शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा देखील पत्नीसह नागपूरला पोहोचले आहेत. आपल्या फेव्हरिट क्रिकेटरला पाहण्यासाठी येथे चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी पाहता खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
मालिका विजयाची संधी
नागपूर येथे मालिकेतील तिसरा सामना 25 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारताकडे हा टेस्ट जिंकूण सीरीज खिशात घालण्याची चांगली संधी आहे. भारताने आपल्या स्पिनर्सच्या बळावर मोहाली येथे झालेला सामना 108 धावांनी जिंकला. हा सामना भारताने केवळ तीन दिवसातच संपवला होता. तर बेंगलुरुमध्ये भारताने द. आफ्रिकेला पहिला डावात 214 धावांवरच ऑलआउट कले होते. मात्र पावसामुळे हा सामना ड्रॉ झाला होता. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडिवर आहे.
फोटो क्रेडिटः ममता जोगी
पुढील स्लाइड्सवर पाहा, उमेश यादवच्या घरी डिनरसाठी पोहोचलेल्या इंडियन क्रिकेटर्सचे काही खास फोटो... आणि जमलेल्या चाहत्यांची गर्दी...