आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची विजयी सलामी, सलामीला बांगलादेशवर ८२ धावांनी केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकेट घेतल्यानंतर जल्लाेष करताना भारतीय संघाचा युवा गाेलंदाज अावेश खान.
काेलकाता- भारतीय युवा संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील तिरंगी मालिकेत शानदार विजयी सलामी दिली. यजमान टीमने सलामी सामन्यात पाहुण्या बांगलादेशचा धुव्वा उडवला. भारताने ८२ धावांनी सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद केली. स्टार युवा अावेश खानने (४/४) यजमान भारतीय युवा टीमला २२ षटकांत विजय मिळवून दिला. यासह यजमानांनी स्पर्धेत पाच गुणांची कमाई केली.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अापल्या घरच्या मैदानावर ४५.३ षटकांत १५८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बांगलादेश टीमने २२ षटकांत ७६ धावांत गाशा गुंडाळला. बांगलादेश टीमकडून शफिऊल हायेतने सर्वाधिक २६ धावांची खेळी केली. या टीमचे ९ फलंदाज धावांचा दुहेरी अाकडाही पार करू शकले नाही. यातील चार फलंदाज भाेपळाही न फाेडता अाल्या पावली तंबूमध्ये परतले. त्यामुळे पाहुण्या बांगलादेश टीमला लवकरच गाशा गुंडाळावा लागला.

झिशान, अावेश चमकले
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सलामीवीर वाॅशिंग्टन संुदरसह (३४) झिशान अन्सारी (३४) अाणि अावेश खान (नाबाद २५) हे त्रिकूट चमकले. त्यामुळे भारतीय संघाला १५८ धावसंख्या उभी करता अाली. भारताचे सहा फलंदाज हे एकेरी धावांत बाद झाले. अावेशने २९ चेंडूंमध्ये दाेन चाैकार अाणि एका षटकारासह नाबाद २५ धावा काढल्या. तसेच अन्सारीने ६३ चेंडूंमध्ये पाच चाैकारांच्या अाधारे ३४ धावांची खेळी केली. तत्पूर्वी सलामीवीर इशान किशन हा ६ धावांची खेळी करून तंबुत परतला. त्यापाठापेाठ विराट सिंगला भाेपळा ही फाेडता अाला नाही. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने तीन, सेठने दाेन गडी बाद केले.
अावेश खानने घेतल्या शानदार चार विकेट
युवा गाेलंदाज अावेश खानने अापल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सलामीच्या हुसेनला त्रिफळाचीत केले. त्यापाठाेपाठ त्याने अापल्या तिसऱ्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर टीमला दुसरा बळी मिळवून दिला. अशा प्रकारे त्याने सहा षटकांमध्ये ४ धावा देत चार गडी बाद केले. यामध्ये तीन निर्धाव षटकांचा समावेश अाहे. याशिवाय सेठ अाणि झिशान अन्सारीने प्रत्येकी दाेन विकेट घेतल्या. मावी अाणि डगरला प्रत्येकी एक गडी बाद करता अाला.

अफगाणविरुद्ध अाज सामना
कोलकाता येथे शुक्रवारी १९ वर्षाखालील तिरंगी मालिकेला माेठ्या जल्लाेषात सुरुवात झाली. भारताचा दुसरा सामना शनिवारी पाहुण्या अफगाणिस्तान टीमशी हाेणार अाहेे. भारताने सलामीचा सामना जिंकून मालिकेत दमदार सुरुवात केली. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली यजमान टीम या स्पर्धेत खेळत अाहेत. या मालिकेत भारतासह अफगाणिस्तान व बांगलादेश संघ सहभागी झाले. मालिकेतील दाेन अव्वल संघामध्ये २९ नाेव्हेंबर राेजी फायनल हाेणार अाहे.