आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या विजयात सरफराज चमकला, सराव सामन्यात पाकवर ५ विकेटने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावर (बांगलादेश) - खलील अहेमदची (३० धावांत ५ विकेट) घातक गोलंदाजी आणि सरफराज खानच्या (८१) तुफानी खेळीच्या बळावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने वर्ल्डकपपूर्वी सराव सामन्यात पाकिस्तानला ६८ चेंडू शिल्लक ठेवून ५ विकेटने हरवले.
भारताने पहिल्या सराव सामन्यात कॅनडाविरुद्ध ४८५ धावांचा डोंगर उभा करून ३७२ धावांनी विजय मिळवला होता. अाता पाकिस्तानविरुद्ध सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केली. त्यामुळे भारताने पाकला ४४.१ षटकांत १९७ धावांत गुंडाळले.
पाककडून मो. उमरने ३६, हसन मोहसीनने ३३, कर्णधार गौहर हाफिजने २५ तर सलमान फय्याजने २९ धावा काढल्या.

भारताने ३३.४ षटकांत ५ बाद १९८ धावा काढून विजय मिळवला. सरफराज खानने ६८ चेंडूंत १२ चौकार, १ षटकारासह ८१ धावांची खेळी केली. कर्णधार ईशान किशनने १५, ऋषभ पंतने ११, रिकी भुईने १५, अरमान जाफरने १९, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद २८ धावा काढल्या. वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना २८ जानेवारी रोजी आयर्लंडसोबत होईल. ऑस्ट्रेलियाने सुरक्षेच्या कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांच्या जागी आयर्लंडला स्पर्धेत संधी देण्यात आली आहे.