आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल, बुमराहच्या कामगिरीने टीम इंडिया ९ विकेटने विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे - युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (२८ धावांत ४ विकेट) घातक गोलंदाजी आणि आपला पहिला वनडे खेळत असलेला 'प्लेअर ऑफ द मॅच' सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद १०० धावांच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या वनडेत झिम्बाब्वेला ९ विकेटने सहजपणे हरवले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता दुसरा वनडे साेमवारी होईल.

कर्णधार धोनीने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा िनर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. भारताने झिम्बाब्वेला ४९.५ षटकांत १६८ धावांत गुंडाळले. यानंतर धावांचा पाठलाग करताना संथ सुरुवात केली. पदार्पणाचा सामना खेळत असलेला करुण नायरची (११) लवकर गमावली. यानंतर लोकेश राहुल (नाबाद १००) आणि अंबाती रायडू (नाबाद ६२) यांनी विकेट न गमावता भारताला विजय मिळवून दिला. भारताने ४२.३ षटकांत १ बाद १७३ धावा काढून विजय मिळवला.
राहुलचा विजयी षटकार
भारताच्या विजयासाठी २ आणि खेळपट्टीवर नाबाद असलेल्या राहुलला शतकासाठी ६ धावांची गरज होती. स्ट्राइकवर राहुलच होता. त्याने मसकदजाला शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले आणि भारताला विजयही मिळवून दिला. या शतकासह राहुलने पहिल्या वनडेत खेळताना सर्वाधिक खेळीसह शतक ठोकण्याचा विक्रम केला. राहुलने ११५ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०० धावा काढल्या. त्याने षटकार मारताच भारताने विजयी शंखनाद केला. पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय ठरला. अंबाती रायडूने १२० चेंडूंत ५ चौकारांसह नाबाद ६२ धावा काढल्या.

बुमराहच्या ४ विकेट
प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेकडून मुतुंबामीने सर्वााधिक ४१ धावा काढल्या. त्याच्याशिवाय सिबांदाने २१, तर चिगुम्बुराने २३ धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराहने ९.५ षटकांत २ ओव्हर निर्धाव टाकताना २८ धावांत ४ िवकेट घेतल्या.
छायाचित्र : शतकी खेळीदरम्यान चौकार मारताना लोकेश राहुल.
बातम्या आणखी आहेत...