Home »Sports »From The Field» India Farmer Capt An Mobile Is Downed But Aggressive The Mobile

झारखंड टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे हरवलेले तिन्ही माेबाइल सापडले

वृत्तसंस्था | Mar 20, 2017, 03:47 AM IST

  • झारखंड टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे हरवलेले तिन्ही माेबाइल सापडले
नवी दिल्ली -झारखंड टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धाेनीचे हरवलेले तिन्ही माेबाइल रविवारी सापडले. दिल्लीतील हाॅटेलला लागलेल्या अागीनंतर हे माेबाइल हरवले हाेते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानाला सफाई करताना हे माेबाइल सापडले. त्याने प्रामाणिकपणे अापल्या वरिष्ठांकडे दिले. त्यानंतर पाेलिस उपायुक्तांनी याबाबतची माहिती दिली.

शुक्रवारी दिल्लीतील द्वारका परिसरातील एका हाॅटेलला भीषण अाग लागली हाेती. याच हाॅटेलमध्ये धाेनीसह झारखंड टीम हाेती. अागीच्या वृत्तामुळे सर्वांनी तत्काळ हाॅटेल साेडले. धाेनीनेही खेळाडूंसह रूममधून सुखरूपपणे बाहेरचा रस्ता धरला. यादरम्यान त्याचे तिन्ही माेबाइल हे रूममध्येच राहिले हाेते. तीन दिवसांनंतर साफसफाई करताना ते सापडले.

Next Article

Recommended