आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा सलग दुसरा पराभव, ७ गड्यांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाची 2-0 ने आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - सुमार खेळीमुळे अपयशाच्या गर्तेत सापडलेल्या टीम इंडियावर शुक्रवारी पुन्हा एकदा पराभवाची संक्रांत अाली. भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामाेरे जावे लागले. अापली लय अबाधित ठेवताना अाॅस्ट्रेलिया टीमने दुसऱ्या वनडेत भारतावर ७ गड्यांनी मात केली. यासह अाॅस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. या विजयामुळे यजमान अाॅस्ट्रेलिया टीमला पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेता अाली. अाता मालिकेतील तिसरा अाणि भारतासाठीचा निर्णायक सामना रविवारी हाेणार अाहे.

या वेळी भारताकडून सलग दुसऱ्या वनडेत राेहित शर्माने झळकावलेलेे शानदार शतक व्यर्थ ठरले. मात्र, त्याला पराभव टाळता अाला नाही. त्याने सलामीलाही शतकाची नाेंद केली हाेती.

राेहित शर्मा (१२४), विराट काेहली (५९) व अजिंक्य रहाणे (८९) यांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून ३०८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने ४९ षटकांत तीन गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. जाॅर्ज बेली (नाबाद ७६) व ग्लेन मॅक्सवेल (नाबाद २६) यांनी अभेद्य ६५ धावांची भागीदारी करून विजयश्री खेचून अाणली. गाेलंदाजीत ईशांत शर्मा, उमेश यादव अाणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी एक विकेट घेता अाली.

यजमान टीमला सलामीवीर अॅराेन फिंच (७१) अाणि मार्श (७१) यांनी १४५ धावांची दमदार सलामी दिली. त्यामुळे अाॅस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करता अाली. मात्र, रवींद्र जडेजाने फिंचला बाद केले. त्यानंतर कर्णधार स्मिथने ४७ चेंडूंत ४६ धावांची खेळी केली. त्यापाठाेपाठ बेलीने ५८ चेंडूंत सहा चाैकार व एका षटकारासह नाबाद ७६ धावा काढल्या. मॅक्सवेलने २५ चेंडूंत नाबाद २६ धावा काढल्या.

राेहित, काेहली, रहाणेची विराट खेळी
भारताकडून शिखर धवन (६) अपयशी ठरला. त्यानंतर राेहित शर्मा, विराट व अजिंक्य रहाणे यांनी विराट खेळी केेली. राेहितने अापला दबदबा कायम ठेवताना सलग दुसरे शतक ठाेकले. त्याने १२७ चेंडूंत १२४ धावा काढल्या. त्याचे वनडेतील हे दहावे शतक ठरले.
राेहितचा पराक्रम
- गाबाच्या मैदानावर वनडेत शतक ठाेकणारा राेहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन (९१) अाघाडीवर हाेता.
- अाॅस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध सलग दाेन डावांत शतके ठाेकणारा राेहित तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम अाफ्रिकेच्या ग्रीम व भारताच्या लक्ष्मण यांनी केला.
- राेहितने करिअरमध्ये अाॅस्ट्रेलियाविरुद्ध पाचवे शतक केले. त्याने चार शतके अाॅस्ट्रेलियात अाणि एक शतक भारतात ठाेकले.
- राेहितने अाॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या २० सामन्यांत १००० धावा काढल्या. असे करणारा ताे तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वीचा सचिन अाणि विंडीजच्या लाराच्या नावे अाहे.

अार. अश्विन अपयशी
अापल्या घरच्या मैदानावर बळींचा पाऊस पाडणारा अश्विन अाॅस्ट्रेलियन भूमीत अपयशी ठरला. दुसऱ्या वनडेत त्याने १० षटकांत ६० धावा दिल्या. त्याला एकही विकेट घेता अाली नाही. त्यापेक्षा उमेश यादवने सर्वाधिक ७४ धावा दिल्या. त्याला एक गडी बाद करता अाला.