आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-न्यूझीलंड महिला संघात अाज पाचवा वनडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारत अाणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात बुधवारी निर्णायक पाचवा वनडे हाेणार अाहे. दाेन्ही संघांनी अातापर्यंत दाेन विजयांसह पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बराेबरी साधली. त्यामुळे अाता शेवटच्या सामन्यात बाजी मारण्यासाठी यजमान भारतीय महिला संघ प्रयत्नशील असेल. मात्र, यासाठी यजमानांना घरच्या मैदानावर पाहुण्या न्यूझीलंडच्या तगड्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. यातूनच दाेन्ही संघांमधील हा सामना अधिकच रंगतदार हाेण्याची शक्यता अाहे.

सध्या भारतीय संघाची कर्णधार मिताली राज जबरदस्त फाॅर्मात अाहे. अाता हीच लय पाचव्या सामन्यातही कायम ठेवण्याचा तिचा प्रयत्न असेल.