आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा टि्वटरचा पहिलाच प्रयोग झाला फेल, असे असेल स्पर्धेचे वेळापत्रक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीमइंडिया या वेळी भारतात १२ कसोटी, वनडे, टी-२० सामने खेळणार आहे. याची सुरुवात सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी, वनडे सामन्यांच्या मालिकेने होईल. भारतीय खेळाडूंनी या मालिकेची घोषणा ट्विटरवर अनोख्या पद्धतीने केली. खेळाडूंनी क्रमाने ट्विट करताना शहर आणि तारखा सांगितल्या. मात्र, थोड्या वेळाने बीसीसीआयने वेळापत्रक नीट करून सांगितले. यामुळे अजिंक्य रहाणे आणि मो. शमीचे ट्विट चुकीचे ठरले.

टि्वटरच्या माध्यमाने आधी कोहली, रहाणे, शमी यांनी तीन कसोटी तर ऋषी धवन, शिखर धवन आणि मनदीप सिंग, आर. अश्विन आणि अनिल कुंबळे यांनी वनडे सामन्यांची माहिती दिली होती. मालिकेत एकही कसोटी डे-नाईट राहणार नाही.

कसोटी मालिका
-पहिली कसोटी- २२ ते २६ सप्टेंबर ग्रीन पार्क, कानपूर
- दुसरी कसोटी- ३० सप्टेंबर ते ऑक्टोबर ईडन गार्डन, कोलकाता
- तिसरी कसोटी- ते १२ ऑक्टोबर, होळकर स्टेडियम, इंदूर.

एकदिवसीयमालिका
-पहिला सामना- १६ ऑक्टोबर- धर्मशाला.
- दुसरा सामना- १९ ऑक्टोबर दिल्ली.
- तिसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर मोहाली.
-चौथा सामना- २६ ऑक्टोबर रांची.
-पाचवा सामना २९ ऑक्टोबर विशाखापट्टणम.
बातम्या आणखी आहेत...