आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 कोटी लोकांनी पाहिला भारत-पाक सामना, 14 दिवसांच्या आतच मोडणार हा रेकॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला 4 जूनचा सामना टीव्हीवर जवळपास 20 कोटी लोकांनी पाहिला होता. टीव्हीच्या प्रेक्षकांवर लक्ष ठेवणाऱ्या बीएआरसी एजन्सीच्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेटेड वनडे सामना ठरला. आता 18 जूनला होणारा भारत-पाक अंतिम सामना हा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज एजन्सीने व्यक्त केला आहे. 

बीएआरसीने दिली माहिती...
- बीएआरसीनुसार, 20 दर्शकांसह भारत-पाकिस्तान सामना टीव्हीवर पाहण्याऱ्यांचे सरासरी प्रमाण 4.7 कोटी एवढे होते.
- दिड महिन्यापर्यंत चाललेल्या IPL-2017 मध्ये 60 सामन्यात जवळपास 41.1 कोटी लोकांनी क्रिकेट पाहिले.
- म्हणजे IPL च्या सर्व 60 सामन्याच्या अर्धे दर्शक एखट्या भारत-पाक सामन्याने एकत्र केले.

नेहमी असतो हाय रेटींगचा अंदाज...
- स्टारकॉमचे नॅशनल सीओओ बासब दत्ता चौधरी यांनी सांगितले की, भारत-पाकिस्तान सामना पाहणाऱ्यांची संख्या नेहमी प्रचंड असते. 
- आता फायनल सामन्यासाठीही दर्शकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल असा आमचा अंदाज आहे. जर दर्शकांची संख्या कमी झाली तर ते आश्चर्यकारक असेल.

दर्शकांचे अनपेक्षित प्रमाण...
- स्टार इंडियानुसार, दर्शकांची संख्या 20.1 कोटींपर्यंत पोहोचणे हा एक नवीन रेकॉर्ड आहे.
- हा सामना स्टार स्पोर्ट्स आणि डीडी नॅशनलसह चार वाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला होता, परंतु कोणालाच वाटले नव्हते एवढी व्ह्यूवरशिप वाढेल.
बातम्या आणखी आहेत...