आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAK च्या सनाचा अफ्रिदीला टोला, म्हणाली मला तर पाकमध्येच मिळते खरे प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - भारत आणि पाकिस्‍तानच्‍या महिला क्रिेकेट संघातही आज फिरोज शाह कोटला मैदानावर टी- 20 विश्‍वचषकाचा सामना रंगणार आहे. तर, सायंकाळी भारत पाक पुरूष संघात कोलकाता येथे मॅच होईल. दरम्‍यान महिला संघाच्‍या कर्णधारांनी एकमेकिंना या लढतीबाबत चॅलेंज केले आहे. सना म्‍हणाली पाकमध्‍ये मिळते जास्‍त प्रेम..
- पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार सना मीर म्‍हणाली की, तिला भारतापेक्षा पाकिस्‍तानमध्‍ये खेळायला अधिक आवडते, कारण पाकमध्‍ये त्‍यांना जास्‍त प्रेम मिळते. सनाचे हे वक्‍तव्‍य शाहिद आफ्रिदीला टोला असल्‍याचे बोलले जात आहे.
- शाहिद म्‍हणाला होता की, त्‍याला पाकपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळते.
- सनालाही तोच प्रश्‍न विचारला होता जो आफ्रिदीला विचारण्‍यात आला.
- प्रश्‍न असा होता की, आपल्‍याला भारतात खेळणे आवडते की, पाकिस्‍तानमध्‍ये.
- सना म्‍हणाली, "आम्‍हाला भारतात खेळणे आवडते, येथे प्रेम मिळते. मात्र त्‍यापेक्षा आम्‍हाला आमच्‍या देशात खेळणे अधिक आवडते. कारण तेथे खेळण्‍याची आम्‍हाला फार संधी मिळत नाही."
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सनाला बॉलीवूडचे हे अभिनेते आवडतात व इतर खास बाबी..