आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी कसोटी/चौथा दिवस : टीम इंडियाला विजयाची संधी; ८ विकेटची गरज!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टणम - दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया विजयापासून अवघी ८ विकेट दूर आहे. भारताने इंग्लंडपुढे ४०५ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ५९.२ षटकांत २ बाद ८७ धावा काढल्या होत्या. जो. रुट पाच धावांवर खेळतोय. इंग्लंडकडून सलामीवीर हसीब हमीदने १४४ चेंडूंत २५ धावा तर कर्णधार अॅलेस्टर कुकने १८८ चेंडूंत ५४ धावा काढल्या. हे दोघे बाद झाले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५०.२ षटकांत ७५ धावांची सलामी दिली. हमीदला अश्विनने पायचीत केले, तर कुकला जडेजाने बाद केले. कुक दिवसाच्या अखेरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पायचीत झाला. तो बाद होताच दिवसाचा खेळ संपला.

तत्पूर्वी, भारतीय संघाचा दुसरा डाव सर्वबाद २०४ धावांत आटोपला. यादरम्यान विराट कोहली २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. या वर्षी कोहलीने तिन्ही स्वरूपात मिळून २२७७ धावा काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या जो. रुटकडे कोहलीला मागे टाकण्याची संधी असेल. रुटने या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२६५ धावा काढल्या आहेत. तत्पूर्वी, सकाळी कोहलीने ८१, जयंत यादवने नाबाद २७ धावा काढून भारताला २०४ धावांपर्यंत पोहोचवले.

एका कसोटीत भारतीय कर्णधाराचे चौथे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन
- २४८ धावा कोहलीने या कसोटीत सामन्याच्या दोन्ही डावात मिळून काढल्या. एका कसोटीत कोणत्याही भारतीय कर्णधाराचे हे चौथे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरले. २८९ आणि २७८ धावांच्या सामन्यातील एकूण धावांसह सुनील गावसकर अव्वल दोन स्थानांवर आहे. २५६ धावांसह (वि. ऑस्ट्रेलिया २०१४) कोहली स्वत: तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- १७ वर्षांत प्रथमच भारतात चौथ्या डावात एखाद्या विदेशी सलामी जोडीने ३०० पेक्षा अधिक चेंडूंची भागीदारी केली. कुक आणि हमीद यांची भागीदारी ३०२ चेंडूंची झाली. १९९९ मध्ये मॅट हॉर्न आणि गॅरी स्टिड यांनी ३२७ चेंडूंची भागीदारी केली होती.
- १७१ चेंडूंत कुकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या करिअरमधील हे सर्वात संथ अर्धशतक ठरले. रशिदचे मालिकेत १३ बळी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...