आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका कसोटीसाठी क्रिकेटर्सना मिळणार आता 15 लाख रूपये, 6 वर्षात झाली दुप्पट वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसोटी क्रिकेट खेळणा-या भारतीय खेळाडूला एका कसोटीसाठी यापुढे 15 लाख रूपये मिळतील. - Divya Marathi
कसोटी क्रिकेट खेळणा-या भारतीय खेळाडूला एका कसोटीसाठी यापुढे 15 लाख रूपये मिळतील.
मुंबई- बीसीसीआयने भारतीय क्रिकेट खेळाडूंना कसोटी सामन्याच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. सध्या खेळाडूंना एका कसोटीसाठी प्रत्येकी 7 लाख रूपये मिळतात. यात बीसीसीआयने दुप्पट वाढ करत 15 लाख रूपये देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. 2010 साली भारतीय कसोटी क्रिकेट खेळणा-या भारतीय खेळाडूंच्या मानधनात तीनपट वाढ केली होती. 2010 पूर्वी एका कसोटीसाठी खेळाडूंना फक्त 2.5 लाख रूपये मिळत होते. राखीव खेळाडूंच्या मानधनातही दुप्पट वाढ...
- पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या मानधनातही 3.5 लाखांवरून 7 लाख रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
- बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, आम्ही कसोटी क्रिकेटला प्राधान्य देऊ इच्छित आहे. त्यामुळे कसोटी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
- युवा क्रिकेटर्सनाही कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाटावे व त्याच्या प्रति रूची वाढावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून अशा खेळाडूंना चांगले पैसे मिळाले तर त्यावर ते लक्ष केंद्रित करू शकतील.
- ठाकूर पुढे म्हणाले, टी-20 क्रिकेट झटपट लोकप्रिय होत आहे. टी-20 क्रिकेटच्या विविध देशातील लीगमधून खेळाडूंना चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे टी-20 क्रिकेटपासून आपण दूर पळू शकत नाही.
- अशावेळी कसोटी क्रिकेटलाही प्राधान्य दिले व त्यासाठी सेवा-सुविधा पुरवल्या तर खेळाडू क्रिकेटचा मुख्य प्रवाह असलेल्या कसोटी क्रिकेटकडे आकर्षित होतील असा आम्हाला विश्वास आहे.
- 2010 साली वन डे सामन्याचे मानधन 1.8 लाख रूपयांवरून 4 लाख केले होते तर टी-20 क्रिकेटच्या एका सामान्यासाठी एक लाखावरून 2 लाख मानधन केले होते.
का वाढवले मानधन?

- मानधन वाढविण्याचे मुख्य कारण म्हणजे युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटकडे आकर्षित करणे.
- चेतेश्वर पुजारा, मुरली विजय यासारखे खेळाडू फक्त कसोटी क्रिकेट खेळतात. त्यांना यातून कमी पैसा मिळतो.
- अशावेळी कसोटी खेळाडूंचे मानधन वाढवून त्यांचा उत्साह कायम ठेवणे कसोटी क्रिकेटच्या हितासाठी गरजेचे आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...