आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रिकेटचे अच्छे दिन: आता दर सामन्याला खेळाडूंच्या खात्यात १५ लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बीसीसीआयने सहा वर्षांनंतर कसोटी क्रिकेट सामन्याचे वेतन दुप्पट केले आहे. आता खेळाडूंना एका कसोटीसाठी १५ लाख रुपये मिळतील. सध्या एका कसोटीचे ७ लाख मिळतात. यापूर्वी २०१० मध्ये कसोटीपटूंचे वेतन सुमारे तीनपट वाढवले होते. त्या वेळी क्रिकेटपटूंना एका सामन्यासाठी २.५ लाख रुपये मिळत होते. ते वाढवून ७ लाख केले होते. राखीव खेळाडूंचे वेतनहा दुपटीने वाढवून ७ लाख रुपये केले आहे. सध्या त्यांना ३.५ लाख मिळतात. बोर्डाच्या वर्किंग कमिटीच्या शुक्रवारच्या बैठकीत हा निर्णय झाला. बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

इंग्लंडपेक्षा जास्त
प्रतिसामना १५ लाखांच्या हिशेबाने भारतीय खेळाडू सर्वात जास्त वेतन घेणारे ठरले आहेत. आजवर इंग्लंड क्रमांक १ वर होता.

देश वेतन
भारत १५ लाख रु.
इंग्लंड १० लाख रु.
ऑस्ट्रेलिया ७ लाख रु.
पाकिस्तान ४ लाख रु.
{सर्वात कमी प्रतिकसोटी ५० हजार रुपये झिम्बाब्वे खेळाडूंना मिळतात.
परफॉर्मन्सच्या हिशेबाने बोनस
खेळाडूंना परफॉर्मन्सनुसार बोनस मिळताे. टॉप रँकिंग संघाविरुद्ध सामना जिंकल्यास वेतनाच्या ५०% व मालिका जिंकल्यास १००% बोनस मिळताे.
शतकाला ५ लाख अाणि दुहेरी शतकास ७ लाखांचा बोनस. डावात ५ विकेट घेतल्यास ५ लाख व १० विकेटला ७ लाख बोनस मिळताे.
पाकचा वेगळा नियम : भारताला हरवले तर सामना वेतनाच्या २५० % बोनस मिळतो.

वाढीचे कारण...
कमाई चांगली व्हावी हा उद्देश चांगल्या सामना वेतनामुळे नवीन खेळाडू कसोटीकडे वळावे. एकदिवसीयला प्रतिसामना ४ लाख रु. व टी-२० मध्ये २ लाख वेतन मिळते. कसोटीपेक्षा दोन्हीचेही वेतन कमी.
६ वर्षांत ४३% कसोटी सामने भारताने जिंकले
६७ सामने खेळले, २९ जिंकले, २१ हरले व १७ अनिर्णीत राहिले. म्हणजे ४३ % विजय मिळवले.
भारत २०१६-१७ च्या हंगामात १७ कसोटी सामने खेळणार आहे.
हा १३९ वर्षांत एखाद्या संघाने एका हंगामात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आहे.
बातम्या आणखी आहेत...