आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी कसाेटी अाजपासून: सत्रामध्ये सर्वाधिक विजय नाेंदची टीम इंडियाला संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- यजमान टीम इंडिया अापल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध कसाेटीमध्ये बाजी मारून विक्रमी कामगिरीला गवसणी घालण्यासाठी उत्सुक अाहे. भारत अाणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसाेटीला शुक्रवारपासून नागपूर येथील व्हीसीएच्या जामठा क्रिकेट मैदानावर सुरुवात हाेईल. या सामन्यातील विजयाच्या बळावर भारताला यंदाच्या सत्रामध्ये सर्वाधिक कसाेटी सामने जिंकणारा संघ हाेण्याची संधी अाहे. अातापर्यंत सत्रामध्ये टीम इंडियाने सहा कसाेटी सामन्यांत विजयी पताका फडकवली अाहे. यासह भारताने दक्षिण अाफ्रिकेच्या (६ विजय) कामगिरीशी बरोबरी साधली. मात्र, नागपूर कसाेटी जिंकून अाफ्रिकेला मागे टाकण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे.  पहिली कसाेटी अनिर्णीत राहिली.   


शिबिरासाठी वेळ नाही, त्यामुळेच ग्रीन टाॅपवर

क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकामुळे टीम इंडियाला सराव शिबिरामध्ये सहभागी हाेण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे सराव हाेत नाही. यातून भारतीय संघाला ग्रीन टाॅपवर खेळावे लागत अाहे, अशी स्पष्टाेक्ती टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने दिली. त्याला ही मालिका ग्रीन टाॅपवर खेळवली जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. याचाच माेठा फटका काेलकाताा कसाेटीमध्ये यजमानांना बसणार हाेता. मात्र, चेतेश्वर पुजारा व विराट काेहलीच्या झंझावाती खेळीने यजमानांचा पराभव टाळला.  

 

> थेट प्रक्षेपण स. ९.०० वाजेपासून; विजय शंकरवर सर्वांची नजर

 

पहिल्यांदा जामठ्यात अाशियाई टीमविरुद्ध लढत  
- ०५ कसाेटी सामने अातापर्यंत नागपूरच्या जामठा मैदानावर झाले अाहेत. यातील तीन कसाेटींत यजमान भारतीय संघ विजयी झाला. एक लढत ड्राॅ अाणि एक कसाेटी भारताने गमावली.  
- ०१ पहिल्यांदा भारतीय संघ या मैदानावर अाशियाई टीमशी खेळणार अाहे. भारताने या ठिकाणी दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध २, अाॅस्ट्रेलिया, इंग्लंड अाणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी एक कसाेटी खेळली अाहे.   
- ५६६ सर्वाेच्च धावसंख्या भारताने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध रचली हाेती.   
- ७९ नीचांकी धावसंख्या दक्षिण अाफ्रिकेच्या (२०१५) नावे अाहे.
 
भुवनेश्वर, धवनला विश्रांती 
काेलकाता कसाेटी गाजवणारा वेगवान गाेलंदाज भुवनेश्वरकुमार अाणि सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्रांती देण्यात अाली अाहे. संघातून रिलीज करण्याची विनंती केल्यामुळे व्यवस्थापकांनी या दाेघांना विश्रांती दिली.
 
विजय शंकरला संधी ?
तामिळनाडूचा अाॅलराउंडर विजय शंकरला नागपूर कसाेटीत खेळण्याची संधी मिळण्याचे चित्र अाहे. हार्दिकचा पर्याय म्हणून ताे खेळेल. ‘शंकर सातत्याने चमकदार कामगिरी करत अाहे. त्यामुळे त्याचा संघामध्ये समावेश करण्यात अाला. अष्टपैली खेळाडू  मिळाला अाहे,’ असे विराट म्हणाला. 
बातम्या आणखी आहेत...